
सातारा : मोदीजी आणि अमित शाह जो निर्णय घेतील तो मला आणि शिवसेनेला मान्य असेल, याबाबत मी स्पष्ट केले आहे. गृह खात्याबाबत चर्चा होईल. लोकांना जी आश्वासनं दिली आहेत, ती पूर्ण करण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. सर्वात महत्त्वाचं मला काय मिळालं, दुसऱ्याला काय मिळालं हे महत्त्वाचं नसून जनतेला काय मिळणार आहे हे महत्त्वाचं आहे. उपमुख्यमंत्रिपद श्रीकांत शिंदेंना मिळणार अशा चर्चा आपण पत्रकारच चर्चा करत असता. या सर्व चर्चा आहेत. एक बैठक अमित भाई यांच्यासोबत झाली आहे. दुसरी बैठक आमची तिघांची होईल. त्यामधून महाराष्ट्राच्या हिताचा योग्य तो निर्णय होईल, असे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. एकनाथ शिंदे यांनी भाजपचे केंद्रीय नेतृत्व जो निर्णय घेईल, त्याला आपला पाठिंबा असल्याचे जाहीर केले आहे. मात्र, दुसरीकडे एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांना उपमुख्यमंत्रिपद मिळणार, या आणि अशा अनेक चर्चा रंगत आहेत. या पार्श्वभूमीवर साताऱ्यातील दरे गावात शिंदे यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली.

दिनांक ५ डिसेंबर, सायंकाळी पाच वाजता, स्थळ : मुंबईतील आझाद मैदान मुंबई : २० नोव्हेंबरला मतदान झाले, २३ नोव्हेंबरला मतमोजणी झाली. महायुती सरकारचा ...