Friday, February 7, 2025
Homeब्रेकिंग न्यूजOath ceremony : महायुती सरकारच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला

Oath ceremony : महायुती सरकारच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला

दिनांक ५ डिसेंबर, सायंकाळी पाच वाजता, स्थळ : मुंबईतील आझाद मैदान

मुंबई : २० नोव्हेंबरला मतदान झाले, २३ नोव्हेंबरला मतमोजणी झाली. महायुती सरकारचा विधानसभा निकाल जाहीर होऊन तब्बल आठ दिवस होऊनही महायुतीचा शपथविधी सोहळा (Oath ceremony) केव्हा होणार?, हा प्रश्न अनुत्तरीतच राहिल्याने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात उलटसूलट चर्चांना उधाण आले होते.अखेर शनिवारी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर X वर पोस्ट करत शपथविधी सोहळ्याची माहिती दिल्याने शपथविधीच्या सर्व चर्चांना तुर्तास पूर्णविराम मिळाला आहे.

महायुती सरकारचा शपथविधी सोहळा ५ डिसेंबररोजी सायंकाळी ५ वाजता आझाद मैदानावर पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत होणार आहे, असे बावनकुळे यांनी आपल्या पोस्ट म्हटले आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबरला मतदान पार पडले आणि २३ नोव्हेंबरला निकाल लागले. या निकालांमध्ये भाजपप्रणित महायुतीला प्रचंड मोठे यश मिळाले. महाराष्ट्रासोबतच झारखंड विधानसभेचाही २३ नोव्हेंबरला निकाल लागला.

दरम्यान झारखंडचे नवे मुख्यमंत्री म्हणून झामुमोचे हेमंत सोरेन यांनी २८ नोव्हेंबरला शपथ घेतली आणि सरकारने कामाला सुरुवात केली. महाराष्ट्रात मात्र मुख्यमंत्री कोण हेच अजून ठरले नाही. एवढे स्पष्ट बहुमत असताना महायुतीला मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होणार, हे ठरवायला का अडचण जात आहे, याची चर्चा केवळ राज्यात नव्हे तर संबंध देशात होत आहे.

Devendra Fadnavis : मुंबईकरांचा होणार आरामदायी प्रवास! वाढणार ३००लोकल फेऱ्या

मुख्यमंत्री कोण या विषयामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये वातावरण प्रभावित आहे. मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्वात महायुतीने निवडणूक लढवली. त्यामुळे पुन्हा एकदा एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री व्हावेत, अशी अपेक्षा शिंदेंच्या शिवसेनेची आहे. एकनाथ शिंदे यांनी मात्र महायुतीचा जो मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असेल त्याला स्पष्ट समर्थन दिले आहे. त्यातच अजित पवारांच्या राष्ट्रवादीने मुख्यमंत्रीपदासाठी भाजपाला समर्थंन दिले होते. आकड्यांचे गणित पाहिले तर भाजपाकडे थोडे थोडके नव्हे तर भाजपाच्या चिन्हावर १३२ आमदार आहेत. काही अपक्षांनीही त्यांना पाठिंबा देऊ केला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री भाजपाचाच होणार असे सकृतदर्शनी दिसत आहे.

भाजपाला हव्या असलेल्या सर्व निकषांमध्ये देवेंद्र फडणवीस बसतात. सोबतच संख्याबळ, वातावरण, स्वीकारार्हता अशा सगळ्याच गोष्टी भाजपच्या बाजूने आहेत. असे असूनही भाजपाला नाव जाहीर करायला काय अडचण आहे, याचीच चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. भाजपला नवा चेहरा हवा असल्यास भाजपमध्ये तसे चेहरेही आहेत. मात्र तरीही वेळ लागतोच आहे. त्यामुळे भाजपाच विचार करायला जास्त वेळ घेत आहे, असे आता तरी दिसते. ५ डिसेंबरपर्यंत या सगळ्या गोष्टींवर पडदा पडेल आणि महाराष्ट्राला नवे मुख्यमंत्री मिळतील, अशी अपेक्षा करूया, असा सूर महाराष्ट्रातील जनतेकडून आळविला जात आहे. मुख्यमंत्री निश्चित झाला नसला तरी शपथविधीची तारीख, वेळ व स्थळ जाहीर झाल्याने दोन-तीन दिवसांमध्ये मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा होणार असल्याचे बोलले जात आहे.

पुन्हा शिंदेंच्या नावाची समाजमाध्यमांवर चर्चा

निवडणूक निकाल लागल्यानंतर काही वेळ मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे यांची वर्णी लागणार असल्याची चर्चा असतानाच राजकीय धामधुमीत शिंदे यांचे नाव मागे पडले व भाजपाच्या देवेंद्र फडणवीस यांचे नाव पुढे आले. मुख्यमंत्रीपद व सत्तास्थापनेसाठी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशीही चर्चा करुन आले. परंतु शनिवार दुपारपासून समाजमाध्यमांवर पुन्हा एकनाथ शिंदेंच्या नावाची चर्चा होऊ लागली आहे. महायुती सुरुवातीला एक वर्ष शिवसेनेला पर्यायाने एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री पद देऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका शिंदेंच्या नेतृत्वाखाली लढणार असल्याची चर्चा जोर धरु लागली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -