आमदार संजय शिरसाट यांचे वक्तव्य
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा सुरु असताना भाजपाचे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे मुख्यमंत्री होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामुळे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मुख्यमंत्री होणार नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी गृह खात्याची मागणी केली आहे. मात्र त्यांची ही मागणी जोर धरत नसल्यामुळे राजकीय रिंगणात पेच वाढत चालला आहे. अशातच शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
World Aids Day 2024 : जगभरात ‘जागतिक एड्स दिवस’ का साजरा केला जातो? काय आहे ‘या’ दिवसाचे महत्व
एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना संजय शिरसाट यांनी म्हटले की, राजकीय पेचप्रसंग आला तर विचारासाठी वेळ हवा असेल तर शिंदे त्यांच्या गावी जाण्याला प्राधान्य देतात. ते त्यांच्या दरे या गावी जातात. या गावात फोनही लागत नाही. आरामात विचार करून निर्णय घ्यायचा असेल तर शिंदे त्यांच्या गावी जातात. पण आज सायंकाळपर्यंत ते नक्कीच मोठा निर्णय घेतील, असे वक्तव्य आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी मांडले.
दरम्यान, महायुतीची होणारी बैठक दोन दिवसांनी अमित शाह यांचा फोन आल्यानंतर होणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र दुसरीकडे एकनाथ शिंदे अचानक त्यांच्या गावी निघून गेल्यानेच बैठक पुढे ढकलण्यात आल्याची चर्चा सुरू आहे.