Tuesday, February 11, 2025
Homeताज्या घडामोडीWorld Aids Day 2024 : जगभरात 'जागतिक एड्स दिवस' का साजरा केला...

World Aids Day 2024 : जगभरात ‘जागतिक एड्स दिवस’ का साजरा केला जातो? काय आहे ‘या’ दिवसाचे महत्व

World Aids Day : एचआयव्ही संसर्गाबाबत जगभरातील लोकांना जागरूक करण्यासाठी दरवर्षी १ डिसेंबरला जागतिक एड्स दिवस साजरा केला जातो. ‘ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस (Human immunodeficiency viruses : HIV)’ च्या संसर्गामुळे होणारा साथीचा रोग’ एड्स (AIDS) म्हणून ओळखला जातो. जगभरात सगळीकडे या दिवसाला विशेष महत्व आहे. एड्स हा ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरसच्या संसर्गामुळे सगळीकडे पसरला आहे. एड्स हा साथीचा आजार असून एकाच वेळी अनेकांना होण्याची शक्यता असते. हा दिवस १९८८ मध्ये प्रथम साजरा करण्यात आला. संयुक्त राष्ट्र संघाने १९९६ मध्ये, जागतिक स्तरावर एचआयव्ही / एड्सचा प्रचार आणि प्रसार करण्याचे काम हाती घेतले आणि १९९७ मध्ये ‘जागतिक एड्स मोहिमे’ अंतर्गत संसर्ग, प्रतिबंध आणि शिक्षण यावर काम करण्यास सुरुवात झाली. त्यानंतर जगभरात ‘जागतिक एड्स दिन’ साजरा केला जाऊ लागला. हा दिवस साजरा करण्यामागे विशेष कारण आहे. जागतिक एड्स दिवस का साजरा केला जातो? या दिवसाला काय विशेष महत्व आहे? याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.

एड्स दिवस या दिवसापासून साजरा केला

१९८७ मध्ये संपूर्ण जगभरात एड्स दिवस साजरा करण्यामागे थॉमस नेटर आणि जेम्स डब्लू.बन यांनी संकल्पना मांडली होती. स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा येथे WHO (वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन) थॉमस नेटर आणि जेम्स डब्ल्यू. बन हे दोघंही एड्स ग्लोबल प्रोग्रामसाठी सार्वजनिक माहिती अधिकारी म्हणून काम करत होते. त्यानंतर त्यांनी एड्स दिनाची संकल्पना डॉ. जोनाथन मुन यांच्याजवळ मांडली होती. या संकल्पनेला त्यानंतर त्यांनी मान्यता दिली आणि १ डिसेंबरपासून जागतिक एड्स दिवस साजरा केला जाऊ लागला. एड्स हा आजार लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत कोणत्याही वयोगटातील लोकांना होण्याची शक्यता असते. त्यानंतर १९९७ पासून जागतिक एड्स मोहीम सुरू करण्यात आली.

एचआयव्ही एड्स म्हणजे काय?

एचआयव्ही हा एक गंभीर आजार आहे जो एका प्रकारच्या प्राणघातक संसर्गामुळे होतो. ‘अक्वायर्ड इम्यून डेफिशियन्सी सिंड्रोम (acquired immune deficiency syndrome)’ असं एड्सचे पूर्ण नाव आहे. हा एक प्रकारचा विषाणू आहे, ज्याचे नाव एचआयव्ही (ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस/Human immunodeficiency virus) आहे. या आजारात संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीवर हा व्हायरस हल्ला करतो. त्यामुळे शरीर सामान्य आजारांशीही लढण्यास असमर्थ ठरते. विशेष म्हणजे हा आजार तीन टप्प्यात होतो (प्राथमिक अवस्था, वैद्यकीय विलंब आणि एड्स).

‘जागतिक एड्स दिन’ साजरा करण्यामागचं उद्देश

‘जागतिक एड्स दिन’ साजरा करण्यामागचा महत्वाचा उद्देश प्रत्येक वयोगटातील लोकांना एचआयव्ही एड्समुळे पसरलेल्या संसर्गाबद्दल प्रबोधन करणे हा आहे. एड्स ही आज जगातील सर्वात मोठी आरोग्य समस्या आहे. कारण एड्सवर अद्याप कोणतीही लस उपलब्ध नाही. २०२१ मधील युनिसेफच्या अहवालानुसार, जगभरात ३६.९ दशलक्ष लोक एचआयव्हीचे बळी ठरले आहेत. तर भारत सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, भारतात एचआयव्ही रुग्णांची संख्या सुमारे २.१ दशलक्ष अशी आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -