Monday, February 10, 2025
Homeताज्या घडामोडीDevendra Fadnavis : मुंबईकरांचा होणार आरामदायी प्रवास! वाढणार ३००लोकल फेऱ्या

Devendra Fadnavis : मुंबईकरांचा होणार आरामदायी प्रवास! वाढणार ३००लोकल फेऱ्या

वसईमध्ये उभारणार मेगा रेल्वे टर्मिनल; देवेंद्र फडणवीस यांची माहिती

मुंबई : मुंबईकरांचा लोकल (Mumbai Local) प्रवास सुलभ व आरामदायी होण्यासाठी रेल्वे प्रशासन नेहमीच कार्यरत असते. प्रवाशांचा कोंडीमुक्त प्रवास होण्यासाठी देखील सणासुदीच्या काळात रेल्वेकडून जादा लोकल सोडण्यात येतात. अशातच आता प्रवाशांचा दररोजचा प्रवासही गर्दिमुक्त होणार आहे. मुंबईच्या मध्य (Central Railway) आणि पश्चिम रेल्वे (Western Railway) मार्गावरून जादा लोकल फेऱ्या सोडण्यात येणार आहेत. (Local Update)

Skin care: थंडीत हातांच्या त्वचेची अशी घ्या काळजी

लोकल प्रवाशांची दिवसागणिक वाढती लोकसंख्या पाहता केंद्र सरकारने ३०० नव्या लोकल फेऱ्या सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच वसईमध्ये मेगा रेल्वे टर्मिनल देखील उभारले जाणार आहे. त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास आरामदायी आणि सुलभ होणार आहे. त्याचबरोबर एमएमआर प्रदेशातील कनेक्टिव्हिटी, व्यापार आणि रहदारीलाही चालना मिळणार आहे, असे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हटले आहे.

केंद्र सरकारची भेट

समृद्ध आणि विकसित महाराष्ट्राच्या दिशेने पाऊल टाकत केंद्र सरकारने (Central Government) तीन मोठ्या योजनांना मंजुरी दिली आहे. यामध्ये बंदरे जोडणीला बळ देण्यासाठी पूर्वांचल ते मुंबई कॉरिडॉर तयार करण्यात येणार आहे. तसेच मध्य रेल्वेच्या परळ, एलटीटी, कल्याण आणि पनवेल आणि पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल आणि वांद्रे स्थानकांची प्रवासी क्षमता वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. जोगेश्वरीमध्ये नवे टर्मिनस आणि वसईमध्ये मोठे रेल्वे टर्मिनस उभारण्यात येणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -