खासदार नारायण राणे यांची वाहतूक मंत्र्यांकडे मागणी
मुंबई : मुंबईहून थेट तळकोकणात जाण्यासाठी तीन वर्षांसाठी करार पद्धतीने सिंधुदुर्ग ते मुंबई विमानसेवा (Mumbai-Sindhudurga Airport) सुरू करण्यात आली होती. मात्र २६ ऑक्टोबर रोजी मुदत संपल्यानंतर चिपी-मुंबई विमानसेवा बंद करण्यात आली. परंतु लाखो पर्यटकांच्या पसंतीस उतरलेल्या या विमानसेवेला कोकणवासीयांचा चांगला प्रतिसाद लाभला होता. त्यामुळे खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी ही विमानसेवा पुन्हा सुरु करावी अशी मागणी नागरी विमान वाहतूक मंत्र्याकडे केली आहे.
Soap Price Hike : आता अंघोळ करणेही महागणार! कंपन्यांनी वाढवले ‘या’ साबणांचे दर
खा. नारायण राणे यांनी वाहतूक मंत्र्यांकडे विमानसेवेबाबत जारी केलेल्या निवेदनानुसार मुंबई – चिपी (सिंधुदुर्ग विमानतळ) अशी कार्यान्वित असलेली सेवा खूप चांगली होती. सणासुदीच्या काळात तसेच अन्य वेळीही मोठा फायदा प्रवाशांना आणि पर्यायाने कंपनीला होत असायचा. हंगामाच्या वेळी तर एका मार्गासाठी २५ हजारापर्यंत तिकीट देऊन प्रवाशांनी प्रवास केला आहे. या दरम्यान कधीकधी हवामान, तसेच अन्य तांत्रीक कारणामुळे विमानसेवा विस्कळीत झाल्याने त्याचा फटका प्रवाशीसंख्येवरही झाला. परंतु फ्लाइट नेहमीच बुक केल्या गेल्या.
पर्यटक, स्थानिक प्रवासी आणि जिल्ह्यातील अर्थव्यवस्थेला गती मिळावी यासाठी सिंधुदुर्ग विमानतळावरील सेवा त्वरीत कार्यरत व्हावी, अशी मागणीही खा. नारायण राणे (Narayan Rane) यांनी नागरी विमान वाहतूक मंत्री के.राम मोहन नायडू (Ram Mohan Naidu) यांच्याकडे केली आहे.