मुंबई: थंडीच्या दिवसांत आपली त्वचा कोरडी पडते. या दिवसांमध्ये हातांचा ओलावा कायम राखण्यासाठी दिवसातून अनेक वेळा मॉश्चरायजरचा वापर केला जातो.
खूप गरम पाण्याने हात धुतल्याने त्वचा अतिशय रूक्ष तसेच निर्जीव होते. यामुळे थंड अथवा कोमट पाण्याने हात धुवा. यामुळे त्वचेतील ओलावा कायम राहील.
झोपण्याच्या आधी चांगल्या प्रकारचे हँड क्रीम लावा. यामुळे हातांची त्वचा रात्रभर नरम आणि मुलायम राहील.
थंडीत बाहेर जाताना सुती अथवा लोकरीचे कपडे घाला. यामुळे त्वचेचा थंडीपासून बचाव होईल. त्वचेला आतून ओलावा देण्यासाठी स्किन केअरमध्ये व्हिटामिन ई ऑईलचा वापर करा.
आठवड्यातून एकदा हलक्या स्क्रबच्या सहाय्याने हातांची सफाई करा. यामुळे डेड स्किन निघून जाईल. त्यानंतर क्रीम लावण्यास विसरू नका.
थंडीच्या दिवसांतही हातांना सनस्क्रीन लावण्यास विसरू नका. खासकरून तुम्ही बाहेर जात असाल तर सनस्क्रीनचा वापर जरूर करा.
भरपूर पाणी प्या. यामुळे योग्य प्रमाणात शरीर हायड्रेट राहील तसेच त्वचा आतून हेल्दी राहील.