Thursday, May 22, 2025

मनोरंजनताज्या घडामोडी

IFFI 2024: इफ्फी मध्ये ‘घरत गणपती’ चित्रपटाचा गौरव

IFFI 2024: इफ्फी मध्ये ‘घरत गणपती’ चित्रपटाचा गौरव

दिग्दर्शक नवज्योत बांदिवडेकर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पदार्पण पुरस्काराने सन्मानित


मुंबई: ५५ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (IFFI 2024) ‘भारतीय फिचर चित्रपट पुरस्कार’ विभागात ‘घरत गणपती’ या मराठी चित्रपटासाठी दिग्दर्शक नवज्योत बांदिवडेकर यांना पदार्पणातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार देण्यात आला. प्रमाणपत्र आणि पाच लाख रुपये रोख, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.



‘पहिल्याच चित्रपटाला मिळालेला प्रेक्षकांचा प्रतिसाद व पुरस्काराची पोचपावती भारावणारी असल्याची प्रतिक्रिया दिग्दर्शक नवज्योत बांदिवडेकर यांनी व्यक्त केली. एक छान कौटुंबिक कथा व भारतीय संस्कृतीचे दर्शन ‘घरत गणपती’ चित्रपटाच्या माध्यमातून आम्ही दाखविले, त्या चित्रपटाचं आज विविध स्तरावर खूप कौतुक होताना दिसतंय’, याचा अभिमान असल्याचंही दिग्दर्शक नवज्योत बांदिवडेकर सांगतात.


गोव्यात संपन्न झालेल्या यंदाच्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडियामध्ये (इफ्फी)भारतीय फिचर चित्रपट पुरस्काराच्या यादीत पहिल्यांदाच सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकीय पदार्पण हा विभाग जाहीर करण्यात आला. या पुरस्कारासाठी सात चित्रपट स्पर्धेत होते. पुरस्काराच्या या स्पर्धेत ‘ घरत गणपती’ चित्रपटाने आपली मोहोर उमटवली.



Comments
Add Comment