Tuesday, February 11, 2025
Homeताज्या घडामोडीCinema Lovers Day : आजच करा प्लॅन! कोणताही चित्रपट फक्त ९९ रुपयांत

Cinema Lovers Day : आजच करा प्लॅन! कोणताही चित्रपट फक्त ९९ रुपयांत

मुंबई : ‘नॅशनल सिनेमा डे’ (National Cinema Day) निमित्त प्रेक्षकांना थिएटरमध्ये केवळ ९९ रुपयांमध्ये चित्रपट पाहण्याची संधी मिळते. मात्र आता अनेक मल्टिप्लेक्स चैन ब्लॅक फ्रायडेनिमित्त सिनेमा लव्हर्स डे (Cinema Lovers Day) साजरा करत आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी अवघ्या ९९ रुपयांना चित्रपट पाहायला मिळणार आहे. (Movie In 99 Rupees)

Reshma Shinde : शुभमंगला सावधान! रेश्मा शिंदेने केली ‘आयुष्याची नवी सुरुवात’

मिळालेल्या माहितीनुसार, सिनेमा लव्हर्स डेनिमित्त अनेक मल्टिप्लेक्सकडून कोणताही चित्रपट अवघ्या ९९ रुपयांत पाहण्याची सोय करण्यात आली आहे. पीव्हीआर आयनॉक्स, सेनेपोलीस इंडिया, मिराज सिनेमाज, मुव्ही मॅक्स आदी मल्टिप्लेक्स चैन यांचा यामध्ये समावेश आहे. दरम्यान, ही ऑफर केवळ प्रिमियम मुव्ही फॉरमॅट चित्रपटांसाठी लागू असणार आहे. 3D, 4DX 3D, IMAX 3D आणि recliners चित्रपट तुम्हाला मूळ तिकीट देऊनच पाहता येईल.

कोणते चित्रपट ९९ रुपयांत पाहता येणार?

भूलभूलैया-3, द साबरमती रिपोर्ट, सिंघन अगने, कंगुवा, आय वॉन्ट टू टॉक, ग्लॅडीएटर्स-2, विक्ड हे नवे चित्रपट ९९ रुपयांत पाहू शकणार आहेत. तसेच रिरिलीज झालेले बिवी नंबर-1, करण अर्जुन, कल हो ना हो हे देखील चित्रपट फक्त ९९ रुपयांत पाहता येणार आहे. (Cinema Lovers Day)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -