मुंबई : बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) पती राज कुंद्राला (Raj Kundra) काही वर्षांपूर्वी पॉर्नोग्राफी प्रकरणात (Pornography Case) अटक करण्यात आली होती. याप्रकरणामुळे शिल्पा शेट्टी व राज कुंद्रा नेहमीच चर्चेत होते. दरम्यान हे प्रकरण निवळत असताना पुन्हा या अडचणीने तोंड वर काढले आहे. शिल्पा शेट्टीच्या मुंबईतील घरावर ईडीची धाड (ED Action) पडली आहे. त्यामुळे हे दोघे पुन्हा अडचणीत सापडले आहे.
Amravati Crime : खळबळजनक! अमरावतीतील अकोली परिसरात आढळला मुंडके छाटलेला मृतदेह
मिळालेल्या माहितीनुसार, पोर्नोग्राफी प्रकरणामुळे ईडीने शिल्पा शेट्टीच्या घरावर छापा टाकला आहे. राज कुंद्रा आणि त्याच्या कंपनीने अश्लील व्हिडिओ विविध अप्लिकेशन्स, सोशल मीडिया प्लॅटफॉर्वर शेअर करुन कमावलेला पैसा परदेशात पाठवण्यात आला. याच मनी लॉड्रींग केसमध्ये ईडीने शिल्पा आणि राज यांच्या घरावर हा छापा टाकल्याची माहिती आहे. त्याचबरोबर उत्तर प्रदेशासह इतर १५ जागांवरही छापे टाकण्यात आले आहेत.