अमरावती : राज्यभरात खून, मर्डर, चोरी, अत्याचार, आत्महत्या असे गुन्हेगारीचे प्रकार वाढत चालले असताना अमरावतीत धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. अमरावतीतील अकोली परिसरात स्थानिक खोलापुरी गेट पोलीस ठाण्याच्या अंतर्गत स्मशानभूमीजवळ मुंडके छाटलेला मृतदेह आढळला आहे. यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलीस घटनेचा तपास करत आहेत. (Amravati Crime)
Tuljabhavani Mandir : तुळजाभवानी मंदिराचं रुप पालटणार! १०८ फुटी नवं महाद्वार बांधलं जाणार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल दुपारी ही घटना उघडकीस आली. खोलापुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत अकोली स्मशान भूमिजवळ अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला. धड आणि शिर वेगळं आढळलंय. दिवसा ढवळ्या घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. शालिकराम यादव यांच्या शेताजवळ हा मृतदेह आढळला.
दरम्यान, मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी तो मृतदेह ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या शवागारात पाठविला आहे. जुन्या वैमनस्यातून ही हत्या निर्दयीपणे करण्यात आल्याचे सकृत दर्शनी दिसून येत आहे. तसेच मारेकऱ्यांनी खून करु मृताची ओळख पटू नये, यासाठी मुंडकं उडवल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (Amravati Crime)