Amravati Crime : खळबळजनक! अमरावतीतील अकोली परिसरात आढळला मुंडके छाटलेला मृतदेह

Share

अमरावती : राज्यभरात खून, मर्डर, चोरी, अत्याचार, आत्महत्या असे गुन्हेगारीचे प्रकार वाढत चालले असताना अमरावतीत धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. अमरावतीतील अकोली परिसरात स्थानिक खोलापुरी गेट पोलीस ठाण्याच्या अंतर्गत स्मशानभूमीजवळ मुंडके छाटलेला मृतदेह आढळला आहे. यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलीस घटनेचा तपास करत आहेत. (Amravati Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल दुपारी ही घटना उघडकीस आली. खोलापुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत अकोली स्मशान भूमिजवळ अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला. धड आणि शिर वेगळं आढळलंय. दिवसा ढवळ्या घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. शालिकराम यादव यांच्या शेताजवळ हा मृतदेह आढळला.

दरम्यान, मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी तो मृतदेह ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या शवागारात पाठविला आहे. जुन्या वैमनस्यातून ही हत्या निर्दयीपणे करण्यात आल्याचे सकृत दर्शनी दिसून येत आहे. तसेच मारेकऱ्यांनी खून करु मृताची ओळख पटू नये, यासाठी मुंडकं उडवल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (Amravati Crime)

Recent Posts

Devmanus Film : ‘देवमाणूस’ चित्रपटातील ’सोबती’ गाणे प्रदर्शित

मुंबई : लव रंजन आणि अंकुर गर्ग यांच्या लव फिल्म्सने ‘देवमाणूस’मधून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले…

8 minutes ago

घरातच घडली धक्कादायक घटना, पत्नीने केली माजी पोलीस महासंचालकांची हत्या

बंगळुरू : कर्नाटकचे माजी पोलीस महासंचालक अर्थात माजी डीजीपी ओम प्रकाश यांची राहत्या घरातच हत्या…

8 minutes ago

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, २१ एप्रिल २०२५

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण अष्टमी, शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराषाढा, योग साध्व. चंद्र राशी…

59 minutes ago

Summer Tips : उन्हाळ्यात कशी घ्यावी डोळ्यांची काळजी, जाणून घ्या ‘या’ गोष्टी!

मुंबई : उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली आहे. कडक सूर्यप्रकाशात घराबाहेर पडणे त्रासदायक वाटू लागले आहे.…

1 hour ago

क्रिकेटपटूंच्या कराराची BCCI ने केली घोषणा, ३४ खेळाडूंशी करार; फक्त चार खेळाडूंचा ए+ मध्ये समावेश

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने ३४ क्रिकेटपटूंसोबतच्या कराराची घोषणा केली आहे. रोहित…

2 hours ago