वाडा : थंडी पडण्यास सुरुवात झाल्याने आता अनेकांनी आहारात बदल केला आहे. थंडीत अंगात उभ राहावी, यासाठी बाजरीची भाकरी मोठ्या प्रमाणात खाल्ली जाते. त्यामुळे सध्या बाजरीची भाकरी महाग (Millet Bread) झाली असून, दरही वाढले आहेत. थंडी वाढल्याने बाजरीची मागणी वाढली आहे. बाजरी गावरान क्विंटल दर हा कमाल २९०० किमान ३२०० एवढा आहे. संकरित बाजरी किमान ३००० ते ३२०० आहे. महिको किमान ३१०० कमाल ३५०० एवढा क्विंटल दर आहे. तालुक्यात बाजरीच्या भाकऱ्या कमी खातात. तरीसुद्धा थंडीत बाजरी भाकरी खाण्याचे प्रमाण अधिक असते. वाड्यात इतर जिल्ह्यातून बाजरी येते.
Helmet Rule : सहप्रवाशाच्या हेल्मेट सक्तीबाबत नववर्षी निर्णय!
बाजरीत मॅग्नेशियम, पोटॅशियम मोठ्या प्रमाणात असते. ज्यामुळे शरीराबरोबरच हृदयाचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. बाजरी मधुमेहाच्या रुग्णासाठी ही फायदेशीर ठरते. बाजरीतील पोषक तत्व डायबेटिसच्या रुग्णासाठी फायदेशीर ठरतात. आठवड्यातून दोन ते तीन दिवस बाजरीची भाकरी खाल्ल्यास तब्येत चांगली राहण्यास मदत होईल. सध्या थंडीचा हंगाम सुरू झाला आहे तालुक्यात थंडी चांगलीच पडू लागली आहे. त्यामुळे थंडीत अंगात उब राहावी, यासाठी बाजरीची भाकरी खाल्ली जाते, थंडीमुळे बाजरीची मागणी बाजारात वाढली आहे.
गव्हाचे दर प्रति किलो ३५ ते ४० रुपये आहे. क्विंटल मागे २५००रुपये दर आहे. गव्हापासून पीठ तयार करून त्याची चपाती केली जाते. सध्या थंडी असल्याने गव्हा एवजी बाजरीचे पीठ घेण्याकडे कल वाढला आहे. झटपट तयार होणारी आणि आरोग्यास कोणताही अपाय न करणारी असल्याने बाजरीकडे कल असतो. बाजरी कमी साहित्यात आणि लवकर तयार होते. त्यामुळे बाजरीला मोठी मागणी आहे. २२०० ते २८०० पर्यंत दर बाजरीला मिळत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.