मुंबई : पुणे शहरात काल दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचाराची घटना घडली होती. हे प्रकरण ताजे असताना मुंबईत असाच धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. एका टॅक्सी चालकाने तरूणीला पुढे बसवत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. मात्र या घटनेने मुंबई शहरात एकच खळबळ उडाली आहे. (Mumbai Crime)
मिळालेल्या माहितीनुसार, १६ वर्षीय तरुणी कॉलेजला जात असताना टॅक्सी चालक जग्गनाथ काळे (४७) याने तरुणीवर कोणीतरी जादूटोण्याचा केल्याचा बनाव रचत तिला पुढे बसवले. त्यानंतर तरुणीवर लैंगिक अत्याचार केले. दरम्यान, तरुणीच्या तक्रारीनंतर याप्रकरणी नराधम टॅक्सी चालकावर काळाचौकी पोलिसांनी अटक केली आहे.