Tuesday, February 11, 2025
Homeताज्या घडामोडीOnion Rate: कांद्याला तीन हजारापेक्षा कमी भाव

Onion Rate: कांद्याला तीन हजारापेक्षा कमी भाव

सोलापूर: सोलापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत ३५३ गाड्या कांद्याची आवक झाली होती. यंदा आवक कमी असूनही सरासरी भाव अडीच हजार ते २८०० रुपयांपर्यंतच स्थिर आहे. २० क्विंटल कांदा अक्षरश: ५०० रुपये दराने विकला गेला आहे. यावर्षी पावसामुळे हजारो शेतकऱ्यांचा कांदा जागेवरच खराब झाला तर अनेक शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पन्न मिळालेले नाही.

PMP Bus :सिग्नल तोडल्यास पीएमपी बस चालकांना बसणार १२०० रुपये दंड

सततचा पाऊस व सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने कांदा खराब झाल्याच्या शेतकऱ्यांच्या व्यथा आहेत. आज १० क्विंटल कांद्याला प्रतिक्विंटल साडेसहा हजार रुपयांचा दर मिळाला आहे. गुरुवारी सोलापूर बाजार समितीत एकूण ३५ हजार ३०७ क्विंटल (७० हजार ६१४ पिशवी) कांदा विक्रीसाठी आला होता. त्यातील ३५ हजार २७७ क्विंटल कांदा सरासरी दोन हजार ८०० रुपये दराने विकला गेला आहे.गतवर्षी याच हंगामात दररोज सोलापूर बाजार समितीत ७०० ते ८०० गाड्यांची आवक होती. परंतु, निर्यातबंदीमुळे शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळाला नसल्याचा फटका त्यांना सहन करावा लागला. आता निर्यातबंदी नसताना देखील भावात वधारणा झालेली नाही. दरम्यान, शेतकरी गडबड करून ओला कांदा विक्रीसाठी आणत असल्यानेही भाव वाढत नसल्याचे बाजार समितीतील अधिकाऱ्यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी वाळलेला कांदा आणावा, त्याला चांगला दर मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -