Cinema Lovers Day : आजच करा प्लॅन! कोणताही चित्रपट फक्त ९९ रुपयांत

मुंबई : 'नॅशनल सिनेमा डे' (National Cinema Day) निमित्त प्रेक्षकांना थिएटरमध्ये केवळ ९९ रुपयांमध्ये चित्रपट पाहण्याची संधी मिळते. मात्र आता अनेक मल्टिप्लेक्स चैन ब्लॅक फ्रायडेनिमित्त सिनेमा लव्हर्स डे (Cinema Lovers Day) साजरा करत आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी अवघ्या ९९ रुपयांना चित्रपट पाहायला मिळणार आहे. (Movie In 99 Rupees)



मिळालेल्या माहितीनुसार, सिनेमा लव्हर्स डेनिमित्त अनेक मल्टिप्लेक्सकडून कोणताही चित्रपट अवघ्या ९९ रुपयांत पाहण्याची सोय करण्यात आली आहे. पीव्हीआर आयनॉक्स, सेनेपोलीस इंडिया, मिराज सिनेमाज, मुव्ही मॅक्स आदी मल्टिप्लेक्स चैन यांचा यामध्ये समावेश आहे. दरम्यान, ही ऑफर केवळ प्रिमियम मुव्ही फॉरमॅट चित्रपटांसाठी लागू असणार आहे. 3D, 4DX 3D, IMAX 3D आणि recliners चित्रपट तुम्हाला मूळ तिकीट देऊनच पाहता येईल.



कोणते चित्रपट ९९ रुपयांत पाहता येणार?


भूलभूलैया-3, द साबरमती रिपोर्ट, सिंघन अगने, कंगुवा, आय वॉन्ट टू टॉक, ग्लॅडीएटर्स-2, विक्ड हे नवे चित्रपट ९९ रुपयांत पाहू शकणार आहेत. तसेच रिरिलीज झालेले बिवी नंबर-1, करण अर्जुन, कल हो ना हो हे देखील चित्रपट फक्त ९९ रुपयांत पाहता येणार आहे. (Cinema Lovers Day)

Comments
Add Comment

'क्योंकि सास भी कभी बहू थी' २ मध्ये झळकणार बिल गेट्स

मुंबई : २००० ते २००८ च्या कालावधीत घराघरात पोहोचलेली हिंदी मालिका म्हणजेच 'क्योंकि सास भी कभी बहू थी' ही मालिका आता

सुशांतच्या मृत्यू प्रकरणाची फाईल पुन्हा उघडणार?

मुंबई : अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्युप्रकरणाला आता तब्बल चार वर्षांहून अधिक काळ उलटला असला तरी या

रितेश देशमुखने शब्द पाळला; पाठपुरावा करुन मृत ज्युनियर आर्टिस्टच्या कुटुंबाला केली लाखमोलाची मदत!

मुंबई : 'राजा शिवाजी' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान साताऱ्याजवळ कृष्णा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झालेल्या सौरभ

The Ganeshutsav Podcast : 'The Ganeshutsav Podcast' (TGP) चा डंका! चिराग चंद्रकांत खिलारे यांनी जगातील पहिले 'हिंदू उत्सव' पॉडकास्ट सुरू करून मूर्तिकारांना दिले व्यासपीठ

मुंबई : भारतातील समृद्ध उत्सव संस्कृतीला जागतिक स्तरावर पोहोचवण्यासाठी १७ जुलै २०२४ रोजी 'TGP (The Ganeshutsav Podcast)' या विशेष

"मला कधी लग्न करायचं नव्हतं पण..." पॉलाच्या एका मेसेजनं बदललं सारंगचं आयुष्य

पुणे : भारतीय डिजिटल पार्टी (भाडिपा) या लोकप्रिय मराठी यू ट्यूब चॅनलचा संस्थापक आणि अभिनेता सारंग साठे याने

Booby Deol : "नर्व्हस झालो, अक्षरशः घाम फुटलेला!"- 'आश्रम 3' मधील बोल्ड सीनबद्दल बॉबी देओलचा खुलासा; चाहत्यांना धक्का!

बॉलिवूड अभिनेता बॉबी देओल (Bobby Deol) सध्या त्याच्या अभिनय कारकिर्दीच्या सर्वोच्च शिखरावर आहे. ऐन तारुण्यात