Monday, February 17, 2025
Homeताज्या घडामोडीReshma Shinde : शुभमंगल सावधान! रेश्मा शिंदेने केली ‘आयुष्याची नवी सुरुवात’

Reshma Shinde : शुभमंगल सावधान! रेश्मा शिंदेने केली ‘आयुष्याची नवी सुरुवात’

पुणे : ‘लगोरी’, ‘नांदा सौख्यभरे’, ‘चाहूल’, ‘रंग माझा वेगळा’, ‘घरोघरी मातीच्या चुली’ या सर्व मालिकांमधून अभिनेत्री रेश्मा शिंदे लोकांच्या घराघरांत लोकप्रिय झाली. अभिनेत्री सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. अभिनेत्री रेश्मा शिंदे नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे. अभिनेत्रीच्या लग्नाची खूप दिवसांपासून चर्चा सुरु होती. अभिनेत्रीने तिच्या लग्नाची तयारीसुद्धा चाहत्यांसह सोशल मीडियावर शेअर केली होती. मात्र अभिनेत्रीने होणाऱ्या नवऱ्याचा नाव आणि चेहरा अद्याप समोर आणला नव्हता. आता अखेर अभिनेत्रीच्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत. अभिनेत्री आता पवनसह लग्नबंधनात अडकली आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर लग्नाचे फोटो शेअर करून चाहत्यांना खुशखबर दिली आहे. रेश्माच्या लग्नापुर्वीच्या विधींचे अनेक व्हिडीओ, फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. अभिनेत्रीचा पुण्यात शुभविवाह सोहळा संपन्न झाला आहे. रेश्माच्या लग्नाच्या फोटोंवर चाहते आणि मराठी सेलिब्रिटी शुभेच्छांचा वर्षाव करताना दिसत आहेत.

Shilpa Shetty : शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा पुन्हा अडचणीत! मुंबईतील घरावर ईडीची धाड

रेश्मा आणि पवनची काल हळदीचा कार्यक्रम पार पडला. आता समोर आलेल्या फोटोंमध्ये रेश्मा आणि पवन यांचा पारंपरिक लूकने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. रेश्मा आणि पवन यांचा लग्नासाठीचा मराठमोळा लूक खूप खास आहे. अभिनेत्रीने यावेळी गुलाबी रंगाची नऊवारी साडी हिरवा चुडा, चंद्रकोर, नाकात नथ, केसात चंद्रकोरचा खोप आणि मोत्यांचे दागिने परिधान करत सुंदर लुक तयार केला आहे. तर अभिनेत्री रेश्माच्या नवऱ्याने ऑफ व्हाईट शेरवानी, धोतर आणि गुलाबी रंगाचा शेला परिधान करत नवऱ्या मुलाचा लूक तयार केला आहे. या लूकमध्ये दोघेही भारी दिसत आहे. दोघांच्या फोटोवर चाहत्यांसह अनेक मराठी कलाकार देखील तिला लग्नासाठी शुभेच्छा देत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Reshma Shinde (@reshmashinde02)

रेश्माने शेअर केलेल्या फोटोमध्ये दोघे सप्तपदी घेताना दिसत आहे. तर कानपिळी विधीचा फोटोही अभिनेत्रीने शेअर केला आहे. बरेच दिवसांपासून रेश्माच्या लग्नाची चर्चा सुरु होती. रेश्माने तिच्या नवऱ्याबाबत काहीचं उघड केले नव्हते. मात्र सर्वानाच उत्सुकता होती की रेश्माचा नवरा आहे तरी कोण? अखेर काल अभिनेत्रीच्या हळदीदिवशी तिच्या नवऱ्याचा फोटो समोर आला. रेश्माने तिच्या हळदीदिवशी शेअर केलेल्या फोटोंमध्ये नवऱ्याची झलक चाहत्यांना दिसली. याचदरम्यान अभिनेत्री आणि तिचा नवरा पवन या दोघांचीही जोडी सुंदर दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Reshma Shinde (@reshmashinde02)

अभिनेत्रींच्या कामाबद्धल बोलायचं झाल्यास रेश्माने मराठी मालिका ‘लगोरी’, ‘रंग माझा वेगळा’, ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकांमधून अभिनेत्री प्रेक्षकांच्या घरोघरी पोहचली. अभिनेत्री सोशल मीडियावर देखील जास्त सक्रिय असल्यामुळे तिचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. आपल्या सहज सुंदर अभिनयाने रेश्मा नेहमीच सर्वांचं लक्ष वेधून घेत असते. तसेच रेश्माने व्यवसाय क्षेत्रात पदार्पण सुद्धा केलं आहे. छोट्या पडद्यावरील ही अभिनेत्री आता उद्योजिका झाली आहे. रेश्माने पुण्यात कोथरुड येथे पालमोनास या ज्वेलरी ब्रँडबरोबर भागीदारी करून स्वत:चे ज्वेलरी शॉप उघडले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -