बेस्ट अर्थसंकल्प पालिका आयुक्तांना सादर
मुंबई : बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि वाहतूक उपक्रम (बेस्ट) यांच्या कडून आगामी आर्थिक वर्ष २०२४ – २५ चा अर्थसंकल्पीय अंदाज आज सादर करण्यात आला. बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्याकडे ‘बेस्ट’चे महाव्यवस्थापक अनिल डिग्गीकर यांनी हा अर्थसंकल्प सादर केला. पालिका मुख्यालयात झालेल्या या अर्थसंकल्पीय सादरीकरणास सहआयुक्त (आयुक्त कार्यालय) चंद्रशेखर चोरे, नगरसचिव रसिका देसाई, ‘बेस्ट’ चे अधिकारी उपस्थित होते.
सध्या मुंबई महापालिकेवर प्रशासकीय राज आहे त्यामुळे नगरसेवकच नसल्याने स्थायी समिती अस्तित्वात नाही. त्यामुळे गेली दोन वर्षे बेस्ट उपक्रमातर्फे अर्थसंकल्प हा मुंबई महापालिका आयुक्तास थेट सादर केला जातो. बेस्ट उपक्रम गेली अनेक वर्षे तोट्यात आहे. बेस्टला वारंवार मुंबई महापालिकेकडून अनुदान घ्यावे लागते. बेस्ट उपक्रमाचा खर्च व बेस्टचे उत्पन्न यात बरीच तफावत असल्याने बेस्टने यंदा पालिकेकडे मागितलेली अनुदानाची रक्कम व वाढलेला संचित तोटा याची रक्कम गुलदस्त्यातच आहे .
Tarapur : तारापूर गॅस लाईनमध्ये गळती, शॉर्ट सर्किटमुळे लागली आग
तसेच मुंबई महापालिकेकडे बेस्टने सतत अनुदान मागितल्याने आता पालिकेनेही बेस्टला मदत करण्याचे नाकारले आहे व उत्पन्न वाढवण्यासाठी बेस्टला भाडेवाढीची सूचना केली आहे . त्यामुळे यंदाच्या वर्षी तरी बेस्ट बस भाडेवाढ होईल का हे हि गुलदस्त्यातच आहे . तसेच यंदा पालिका निवडणूक असल्याने यंदा तरी काही महिने तरी बेस्ट बस भाडेवाढ होणार नाही त्यामुळे मुंबईकरांना काही महिने दिलासा मिळेल. बेस्टच्या ताफ्यात सध्या बसगाड्यांची मोठी कमतरता आहे . प्रवाश्याना तासनतास बस साठी वाट पाहावी लागत आहे . बेस्टकडे खाजगी व कंत्राटदारांच्या बस मिळून सध्या २ हजर ९०० बस आहेत .
तसेच स्वतःचा ताफा १ हजार बस पर्यंत खाली आला आहे . बेस्टला आपला बस ताफा वाढवण्यासाठी ७ हजार बसची आवश्यकता आहे . तसेच बेस्ट मध्ये खाजगी कंत्राटदार टिकत नसल्याने बेस्ट ला स्वतःचा ताफा घेणे आवश्यक बनले आहे . मात्र बेस्टकडे स्वतःच्या बस घेण्यासाठी निधी नाही. त्यामुळे बेस्ट ने पालिकेकडे बसगाड्या खरेदी करण्यासाठी अनुदानाची मागणी केली आहे . पालिका बेस्टला बसगाड्या खरेदी करण्यासाठी अनुदान देणार का हे हि गुलदस्त्यातच असेल .