PM Narendra Modi : पंतप्रधानांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी, मुंबई पोलिसांना आला फोन!

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला हा धमकीचा फोन आला. दरम्यान तपासाअंतर्गत अंबोली पोलिसांनी एका महिलेला आरोपाखाली ताब्यात घेतले आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला बुधवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास धमकीचा फोन आला. 'पंतप्रधान नरेंद्र मोदींना मारण्याचा कट सुरू असून हत्याराची तयारी झाल्याची' माहिती फोन करणाऱ्या व्यक्तीने पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीने या घटनेची गंभीर दखल घेत अंबोली पोलिसांनी शितल चव्हाण (३४) नावाच्या महिलेला ताब्यात घेतले आहे. या महिलेला विचारपूस दरम्यान कोणतीही संशयित माहिती समोर आली नाही. कौटुंबिक वादातून मानसिक तणावात असलेल्या महिलेने हा फोन केल्याचे प्राथमिक पोलीस तपासात समोर आले आहे. पोलीस पुढील तपास करत आहे.



याआधीही दिली होती जीवे मारण्याची धमकी


पंतप्रधानांना याआधीही कर्नाटकमधील मोहम्मद रसूल कद्दारे नावाच्या एका व्यक्तीने मोदी यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. समाज माध्यमावर हातात तलवार घेऊन त्याने एक व्हिडीओ शेअर केला होता. केंद्रात काँग्रेसची सत्ता आल्यास मी मोदींना जीवे मारणार, अशी धमकी समाज माध्यमावर देण्यात आली होती. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कर्नाटकमधील सूरपूर पोलीस ठाण्यात या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. (PM Narendra Modi)

Comments
Add Comment

बिबट्यांच्या समस्येवर ९० दिवसांत उपाय करा

नागपूर : बिबट्याची दहशत संपवा, राज्यात दोन बिबट्या रेस्क्यू सेंटर सुरू करा... बिबट्यांच्या समस्येवर ९० दिवसांत

सौदी अरेबियाचा मोठा निर्णय! मद्यप्राशनास परवानगी

कडक नियमात शिथिलता सौदी अरेबिया : सौदी अरेबियातील कायदे शरिया (इस्लामिक धार्मिक कायदा)वर आधारित आहेत.

श्रीलंका टी-२० मालिकेसाठी भारतीय महिला संघ जाहीर

मुंबई : वर्ल्ड चॅम्पियन भारतीय संघ अखेरीस मोठ्या विश्रांतीनंतर मैदानावर उतरणार आहे. महिला एकदिवसीय विश्वचषक

महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा

मुंबई : राज्यासह देशातील वातावरणात सातत्याने बदला होताना दिसत आहे. डिसेंबर महिन्याचा पहिला आठवडा गेला असूनही

भारताचे द. आफ्रिकेसमोर १७६धावांचे लक्ष्य, हार्दिक पांड्याचे धमाकेदार अर्धशतक

कटक (वृत्तसंस्था) : कटकच्या मैदानात सध्या हार्दिक पांड्याच्या बॅटने आफ्रिकेच्या गोलंदाजांची धुलाई सुरू केली.

विठुनामाच्या जयघोषाने मुंबापुरी दुमदुमणार

मुंबई : वारकरी संप्रदायाच्या वैचारिक ऐश्वर्याचे दर्शन मुंबईकरांना घडावे यासाठी गेली २६ वर्ष सुरू असणारा