मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला हा धमकीचा फोन आला. दरम्यान तपासाअंतर्गत अंबोली पोलिसांनी एका महिलेला आरोपाखाली ताब्यात घेतले आहे.
Maharashtra Government Formation : महाराष्ट्राचे ३ प्रमुख नेते तातडीने दिल्लीकडे रवाना
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला बुधवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास धमकीचा फोन आला. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदींना मारण्याचा कट सुरू असून हत्याराची तयारी झाल्याची’ माहिती फोन करणाऱ्या व्यक्तीने पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीने या घटनेची गंभीर दखल घेत अंबोली पोलिसांनी शितल चव्हाण (३४) नावाच्या महिलेला ताब्यात घेतले आहे. या महिलेला विचारपूस दरम्यान कोणतीही संशयित माहिती समोर आली नाही. कौटुंबिक वादातून मानसिक तणावात असलेल्या महिलेने हा फोन केल्याचे प्राथमिक पोलीस तपासात समोर आले आहे. पोलीस पुढील तपास करत आहे.
याआधीही दिली होती जीवे मारण्याची धमकी
पंतप्रधानांना याआधीही कर्नाटकमधील मोहम्मद रसूल कद्दारे नावाच्या एका व्यक्तीने मोदी यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. समाज माध्यमावर हातात तलवार घेऊन त्याने एक व्हिडीओ शेअर केला होता. केंद्रात काँग्रेसची सत्ता आल्यास मी मोदींना जीवे मारणार, अशी धमकी समाज माध्यमावर देण्यात आली होती. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कर्नाटकमधील सूरपूर पोलीस ठाण्यात या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. (PM Narendra Modi)