Tuesday, February 11, 2025
HomeदेशMaharashtra Government Formation : महाराष्ट्राचे ३ प्रमुख नेते तातडीने दिल्लीकडे रवाना

Maharashtra Government Formation : महाराष्ट्राचे ३ प्रमुख नेते तातडीने दिल्लीकडे रवाना

नवी दिल्ली : विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राचं सरकार कोणाच्या हाती येणार याकडे सर्वांचंच लक्ष लागून आहे. विधानसभा निवडणुकीनंतर राज्याचे राजकारण आता चांगलंच रंगले आहे. एकतर्फी निकाल महायुतीच्या बाजूने लागल्यानंतरसुद्धा लवकर सत्तास्थापनेबाबत दावा केला नाही. भाजपने १३४ जागांवर विजय मिळवून सर्वांत मोठा पक्ष असल्याचं सिद्ध केले. त्यामुळे आता मुख्यमंत्री हा भाजपचाच असावा असा दावा सर्व भाजप नेत्यांकडून केला जात आहे. मात्र आता घडामोडींना वेग आला असून राज्यातील महायुतीचे तिन्ही प्रमुख नेते तातडीने दिल्लीकडे रवाना झाले आहेत.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा २३ नोव्हेंबर रोजी निकाल हाती आला. यामध्ये महायुतीचा भरघोस विजय पाहून सर्वांना आश्चर्य वाटले. तर विरोधी पक्ष नेतापदावर दावा करण्याएवढे देखील संख्याबळ विरोधकांना मिळवता आलेला नाही. यामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला. मात्र महायुतीने संपूर्ण बहुमत हाती मिळवून देखील लवकर सत्तास्थापनेचा दावा न केल्यामुळे विरोधकांनी टीकेची झोठ उठवली होती. आता मात्र लवकरच राज्यामध्ये सरकार स्थापन होणार असून यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्यासह एकनाथ शिंदे व अजित पवार हे दिल्लीकडे रवाना झाले आहेत.

दिल्लीमध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा निर्णय घेतला जाणार आहे. यापूर्वी निवडणुकीच्या जागावाटप व फॉर्मुला ठरवण्यावेळी नेत्यांनी दिल्लीवारी केली आहे. भाजपचे पक्षश्रेष्ठी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी नेते भेट घेणार आहेत. त्यामुळे आता अमित शाह यांच्याशी चर्चा करुन महाराष्ट्राच्या सरकारस्थापन आणि मंत्रीपदाचे वाटप याची चर्चा होणार आहे.

Vinod Tawde : विनोद तावडे ‘गेमचेंजर’! अमित शाहांसोबत रात्रीच्या बैठकीत नेमकी कोणती खलबतं झाली?

यावेळी देखील महायुतीच्या पूर्वीच्या सरकारप्रमाणे एक मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री असणार आहेत. अजित पवार यांनी यापूर्वीच मुख्यमंत्रिपदावरील दावा सोडला होता. तर एकनाथ शिंदे यांनी देखील पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्रिपदाचा दावा सोडला आहे. यामुळे आता मुख्यमंत्री हा भाजपचाच असेल हे स्पष्ट झाले आहे. देवेंद्र फडणवीस यांचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी आग्रही आहे. यासाठी भाजपची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा देखील पाठिंबा आहे. मात्र आता दिल्लीतील बैठकीमध्ये भाजप पक्षश्रेष्ठी नक्की काय निर्णय घेतात याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -