Saturday, May 10, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

Amravati: दर्यापूर बाजार समितीत मिळाला कापसाला ८००० हजारांचा उच्चांकी दर !

Amravati: दर्यापूर बाजार समितीत मिळाला कापसाला ८००० हजारांचा उच्चांकी दर !

अमरावती: कृषी उत्पन्न बाजार समिती यार्डवर कापूस शेतमाल वगळता सर्व शेतमालाचा खुल्या पध्दतीने हर्हास होत असतो त्यामध्ये शेकऱ्यांच्या शेतमालाला अधिक भाव मिळून शेतकरी वर्गाच समाधान बघायला मिळत याच पद्धतीने कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या कापूस शेतमाल विक्री देखील हर्यास पध्दतीने व्हावी व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अधिका अधिक भाव मिळावा या प्रामाणिक हेतूने बाजार समिती संचालक मंडळाने निर्णय घेतला व आंतराष्ट्रीय सहकार दिनाचे औचित्य साधत याच पद्धतीचा शुभारंभ मा. खासदार बळवंत भाऊ वानखडे व मा. सुधाकर पाटील भारसाकडे यांच्या मार्गदर्शनात तसेच ऍड श्रीरंग पाटील अरबट यांच्या हस्ते आज रोजी झाला.



बाजार समितीचे सभापती सुनिल पाटील गावंडे यांनी शेतकरी वर्गाला केलेल्या आव्हाहणाला शेतकऱ्यांनी प्रतिसाद देत आज बाजार समिती यार्डवर आपल्या कापूस गाड्या आणून बाजार समितीला सहकार्य केले. सर्वप्रथम कापूस गाड्या ह्या बाजार समिती यार्डवर आणून त्याची नोंद करून टोकन वाटप करून बाजार समितीच्या वतीने कापूस विक्री करिता आणलेल्या सर्व शेतकरी बंधूंचा शाल व श्रीफळ , रोप देऊन सत्कार करण्यात आला याचबरोबर कापूस खरेदी करणाऱ्या व्यापारी वर्गाचा देखील सत्कार करण्यात आला. कापूस हर्यास झाल्यानंतर बाजार समितीची सौदापट्टी घेऊन गाड्या जिनिंगवर मोजमापाकरिता पाठवण्यात आल्या. यावेळी कापसाला रुपये ८००० हजार उचाकी भाव मिळाला तर सरासरी ७४५० ते ७५२१ पर्यंत भाव खुल्या बाजारात मिळाला यावेळी शेतकरी बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments
Add Comment