
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार राजभवन येथे पोहोचले. यावेळी या तिघांनीसुद्धा आपापले राजीनामे राज्यपाल राधाकृष्णन यांच्याकडे सोपवले. यावेळी तिथे मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर आणि मंत्री दादा भुसे सुद्धा उपस्थित होते. यावेळी राजीनाम्याची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करत राज्यपालांनी या तिघांचे राजीनामे स्वीकारले. मात्र, नवे सरकार स्थापन होईपर्यंत राज्याच्या काळजीवाहू मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी एकनाथ शिंदे यांच्याकडेच सोपविण्यात आली आहे. परंतु, आता राज्यात महायुतीची सत्ता येणार हे माहीत असले तरी महायुतीतून मुख्यमंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार ? हे जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.Eknath shinde | एकनाथ शिंदे यांनी सोपवला मुख्यमंत्री पदाचा राजीनामा . .#EknathShinde #mukhyamntri #regignation #ChiefMinisterofMaharashtra #prahaarnewsline #dailyupdates pic.twitter.com/oqjg9rFRew
— Prahaar Newsline (@PrahaarNewsline) November 26, 2024
मुख्यमंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात?
महायुतीमध्ये सर्वात मोठा पक्ष भाजप असल्यामुळे मुख्यमंत्रिपदावर भाजपा ठाम आहे. भाजपातील नेत्यांकडून तशी भूमिका घेतली जात आहे. तर दुसरीकडे विधानसभा निवडणुकीत महायुतीने शिंदे यांचाच चेहरा समोर ठेवलेला आहे. एकनाथ शिंदेचं लाडकी बहीण योजनेचा प्रचार करताना समोर होते. महायुतीला त्यांच्यामुळेच यश मिळाले आहे. त्यामुळे किमान अडीच वर्षे तरी शिंदे यांना मुख्यमंत्रिपद मिळावे, अशी भूमिका शिवेसना पक्षातील नेत्यांची आहे. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागले आहे.
Maulana Nomani: महायुतीच्या विजयाच्या धसक्याने मौलाना नोमानींनी मागितली जाहीर माफी
मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीचा दणदणीत विजय झाला आहे. या घवघवीत यशानंतर दरदरुन घाम फुटलेल्या मौलाना सज्जाद नोमानी यांनी ‘व्होट ...