Winter : थंडीत गिझरच्या वापरामुळे खूप बिल येते, या टिप्स वापरा होईल बचत

मुंबई: भारतात थंडीची(Winter) लाट आली आहे. नोव्हेंबरचा महिना संपत आला नसून थंडीचा कडाका दिवसेंदिवस वाढत चालला आहे. थंडीच्या दिवसांत थंड गोष्टीपासून दूर राहणेच सारे पसंत करतात. त्यामुळे पाण्यातही हात घालावासा वाटत नाही. आंघोळीसाठी तर या दिवसांमध्ये कडकडीत पाण्याला पसंती दिली जाते.


गरम पाण्यासाठी अनेकजण गिझरचा वापर करतात. थंडीच्या दिवसांत लोकांच्या घरांमध्ये गिझरचा वापर सर्रास केला जातो. मात्र गिझरमुळे विजेचे बिल चांगलेच वाढते. तुमच्या घरात गिझर आहे का तसेच तुम्हीही विजेच्या वाढत्या बिलाने त्रस्त आहात का? तर आम्ही तुम्हाला देत आहोत टिप्स...



कधीही गिझर सुरू ठेवू नका


गिझरचा वापर सतत करू नका. म्हणजेच जेव्हा गरज नसेल तेव्हा गिझर बंद ठेवा. गिझर खूप वेळ चालू ठेवल्यास विजेचे बिल वाढते. नव्या गिझरमध्ये ऑटो कटची सुविधा असते. मात्र तुमच्याकडे जुने गिझर असल्यास तो वेळोवेळी बंद करत राहा.



नव्या टेक्नॉलॉजीचा गिझर घ्या


सामान्यपण लोक जो गिझर लावतात तोच वर्षानुवर्षे वापरतात. जुन्या गिझरमुळे विजेचे बिल अधिक येते. यामुळे जास्त इलेक्ट्रिसिटी खर्च होते. आजकाल बाजारात नवे गिझर आहेत. सोबतच फाईव्ह स्टार रेटिंग असलेले गिझर विजेचे बील कमी करण्यास मदत करतात.



मोठ्या गिझरचा वापर


साधारणपणे जर तुम्ही छोटा गिझर वापरला तर तुम्हाला सतत पाणी गरम करावे लागते. मात्र त्याऐवजी मोठा गिझर वापरा. त्यामुळे एकदम मोठ्या प्रमाणात पाणी गरम होईल. आणि विजेचीही बचत होईल.

Comments
Add Comment

टोमॅटो खाण्याचे 'हे' फायदे ऐकलेत तर तुम्ही आजपासूनच टोमॅटोचे सेवन करायला सुरुवात कराल

जर तुम्हाला सलग ३० दिवस टोमॅटोचा रस प्या असे सांगितले तर तुम्ही प्याल का? असा प्रश्न आहे. पण तुम्हाला जर महिनाभर

फक्त एक महिना 'या' पिठाची भाकरी खा आणि गव्हाची चपाती विसरा, वजन झटपट कमी होईल

आजच्या धावपळीच्या जीवनात लोकांना स्वतःसाठी वेळ काढता येत नाही. त्यामुळे सकाळचा नाश्ता होत नाही, दुपारी जे मिळेल

युरिक ऍसिड पासून मुक्तता हवी असेल तर रोज एक कप प्या हे पेय

शरीरामध्ये युरिक अ‍ॅसिडची पातळी वाढल्यास सांधेदुखी, सांध्यावर सूज येणे आणि चालणंही कठीण होते. 2020 मधील एका

लिंबू पाणी प्यायल्यामुळे वजन कमी होते का ? वाचा सविस्तर...

बऱ्याच लोकांना आपला दिवस एक ग्लास लिंबू सरबताने सुरू करणे आवडते. लिंबाचे पाणी शरीराला डिटॉक्स करते आणि पचन

दिवसभरात किती चपात्या खाणं योग्य? जास्त खाल्ल्यास लगेच बदला ही सवय

आपल्या दैनंदिन आहारातील चपाती म्हणजेच पोळी हा अविभाज्य भाग आहे. मग डाळ असो वा भाजी, चपातीशिवाय आपलं जेवण अपूर्ण

पिवळ्या आणि काळ्या मनुका, आरोग्याला कोणत्या जास्त फायद्याच्या ?

मुंबई : मनुका आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जातात. लोक अनेकदा सकाळी रात्री भिजवलेले मनुका खातात, ज्यामुळे