Tuesday, February 11, 2025
Homeताज्या घडामोडीMilind Soman : जुहू बीचवर १० किमी धावून आजींचा फिटनेस साजरा!

Milind Soman : जुहू बीचवर १० किमी धावून आजींचा फिटनेस साजरा!

जेबीजी इनव्हिन्सिबल वुमन आणि पिंकाथॉनकडून उपक्रम आयोजित

मुंबई : जेबीजी इनव्हिन्सिबल वुमन आणि पिंकाथॉन (Pinkathon) यांनी संयुक्तपणे आज जुहू बीचवर आजींची १० किमी रन आयोजित करण्यात आली होती. ‘एज डजन्ट डिफाईन मी’ (Age Doesnt Define Me) हे सिद्ध करण्यासाठी ५५ ते ८० वयोगटातील सर्व वयोवृद्ध महिलांसाठी काढलेल्या या उपक्रमात आजींचा भन्नाट प्रतिसाद मिळाला.

Kantara Team Accident : भीषण अपघात! ‘कांतारा’ सिनेमाच्या टीमची बस पलटली

या कार्यक्रमात २.५ किमी, ५ किली आणि १० किमी रन अशा तीन श्रेणी काढल्या होत्या. यामध्ये वयोवृद्ध महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. फिटनेस आयकॉन आणि पिंकाथॉनचे निर्माते, मिलिंद सोमण (Milind Soman) यांनी सकाळच्या उत्साही वातावरणात प्रेरणा आणि प्रोत्साहन जोडून सहभागींना आनंद दिला. तसेच आरोग्य, तंदुरुस्ती आणि पिढ्यानपिढ्या महिलांच्या अतुलनीय दृढनिश्चयाचा उत्सव साजरा करणारा हा कार्यक्रम जबरदस्त यशस्वी ठरला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -