Monday, February 10, 2025
Homeताज्या घडामोडीKantara Team Accident : भीषण अपघात! 'कांतारा' सिनेमाच्या टीमची बस पलटली

Kantara Team Accident : भीषण अपघात! ‘कांतारा’ सिनेमाच्या टीमची बस पलटली

अनेक कलाकार जखमी; सिनेमाचे शूटींगही थांबले

बंगळूर : मनोरंजन क्षेत्रातून (Entertainment News) मोठी बातमी समोर आली आहे. ऋषभ शेट्टी (Rishab Shetty) यांच्या कांतारा चॅप्टर १’ (Kantara Chapter 1) चित्रपटाबाबत मोठी घटना घडली आहे. कंतारा चित्रपटातील संपूर्ण टीमचा भीषण अपघात (Kantara Team Accident) झाला आहे. यामध्ये अनेक कलाकार जखमी झाले असून काहींची परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळे चित्रपटाचे शुटींग देखील थांबवण्यात आले आहे.

Pinga G Pori Pinga: प्रत्येक महिलेच्या मनाचा आरसा दाखवणारी ‘पिंगा गं पोरी पिंगा’

मिळालेल्या माहितीनुसार, सध्या कर्नाटकातील उडुपी जिल्ह्यात ‘कांतारा चॅप्टर १’चे शुटींग सुरु होते. रविवारी रात्रीच्या सुमारास शूटींगच्या सेटवरुन परतणाऱ्या कलाकारांची मिनी बस पलटल्यामुळे भीषण अपघात झाला. या मिनी बसमध्ये २० कलाकार होते. या घटनेनंतर जखमींना जडकल आणि कुंदापूर येथील रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले असून कोल्लूर पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

दरम्यान, १२ ऑक्टोबर २०२५ रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. मात्र झालेल्या या अपघातामुळे चित्रपटाच्या शुटींगवर काहीसा परिणाम होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -