Monday, February 17, 2025
Homeताज्या घडामोडीनववर्षाच्या सुरुवातीला लागू होणार TRAIचे 'हे' नवे नियम!

नववर्षाच्या सुरुवातीला लागू होणार TRAIचे ‘हे’ नवे नियम!

पाहा कोणाला होणार फायदा?

मुंबई : भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाकडून (TRAI) सातत्याने नवे अपडेट्स जारी होत असतात. अशातच आता पुन्हा टीआरएआयचे नवे नियम (TRAI New Rule) लागू होणार आहेत. देशभरातील दूरसंचार सेवांच्या सुधारणा करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने नवीन दूरसंचार नियम लागू करण्याचे आदेश दिले आहेत.

Ice Eating Habit : बर्फ खाणे ही आवड नव्हे तर आजार! पाहा तज्ज्ञ काय म्हणतात?

मिळालेल्या माहितीनुसार, सध्या वेगवेगळ्या राज्यामध्ये परवानगीसाठी वेगवेगळे नियम आणि शुल्क आहेत, ज्यामुळे कंपन्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र आता मोबाईल नेटवर्कसाठी लागणाऱ्या इन्फ्रास्ट्रक्चर उभारणीसाठी ‘राईट ऑफ वे’ (RoW) हा नवीन नियम लागू करण्यात येणार आहे. यामुळे देशभरातील सर्व दूरसंचार कंपन्यांना एकसमान शुल्क आकारण्यात येणार आहे.

दरम्यान, हे नियम जिओ (JIO), एअरटेल (Airtel), बीएसएनएल (BSNL) आणि व्होडाफोन-आयडिया (Vi) या कंपन्यांसाठी लागू होणार असून नववर्षापासून टीआरएआयची नवी नियमावली जारी होणार आहे.

काय फायदा होणार?

ROW नियमानुसार, परवानगी मिळवण्याची प्रक्रिया डिजिटल पद्धतीने होणार आहे. यामुळे राज्य सरकारांकडून दिल्या जाणाऱ्या परवानग्यांमध्ये पारदर्शकता येणार असून प्रक्रिया जलद व सोपी होईल. तसेच 5G टॉवर्सच्या उभारणीला गती मिळणार आहे.

मोबाईल वापरकर्त्यांना काय लाभ होईल ?

  • वेगवान नेटवर्क : 5G सेवेचा विस्तार जलद होईल.
  • उत्तम कनेक्टिव्हिटीः  देशभरात नेटवर्कची गुणवत्ता सुधारेल.
  • पारदर्शक सेवाः  डिजिटल परवानगी प्रक्रियेमुळे ग्रहिकांना अखंड सेवा मिळेल. (TRAI New Rule)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -