Saturday, February 8, 2025
Homeताज्या घडामोडीIce Eating Habit : बर्फ खाणे ही आवड नव्हे तर आजार! पाहा...

Ice Eating Habit : बर्फ खाणे ही आवड नव्हे तर आजार! पाहा तज्ज्ञ काय म्हणतात?

मुंबई : अनेकांना बर्फाचा होळा, बर्फाचे आईस्क्रीम खाण्यास आवडते. परंतु असे काही जण असतात ज्यांना फक्त बर्फ चघळायला किंवा खायला (Ice Eating Habit) आवडते. मात्र बर्फ खाल्ल्यामुळे अनेक आजारांना सामोरे जावे लागते. अशातच डॉक्टर तज्ज्ञांनी बर्फ खाण्याबाबत मोठा अहवाल समोर आणला आहे.

Assembly election result: निवडणुकीच्या जल्लोषादरम्यान लागली आग, नवनिर्वाचित आमदारांसह अनेक महिला जखमी

एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, बर्फ चघळणे ही एक अशी परिस्थिती आहे जिथे एखाद्या व्यक्तीला सतत बर्फ खाण्याची किंवा कोणतेही पौष्टिक मूल्य नसलेले पदार्थ चघळण्याची इच्छा असते. या इच्छेला पिका (pica) असे म्हणतात. लोकांच्या शरीरातील लोहाची कमतरता आणि कमी अशक्तपणा असणाऱ्यांना सतत बर्फ खाण्याची सवय असते.

बर्फ चघळल्यामुळे दातांमध्ये फटी येण्यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात, तसेच दातांच्या एनामेलचे नुकसान होऊ शकते आणि दातांची संवेदनशीलता वाढू शकते. दातांना बर्फाच्या कठोरतेचा सामना करण्यासाठी तयार केलेले नाही आणि वारंवार ताणामुळे दातांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. त्यामुळे बर्फ खाण्याऱ्यांनी वेळीच सावधान व्हावे, असेही डॉक्टरांनी सअंगितले आहे. (Ice Eating Habit)

(टीप : वरील माहिती डॉक्टरांच्या आधारे दिली असून ‘प्रहार’ अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही.)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -