
पाहा कोणाला होणार फायदा?
मुंबई : भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाकडून (TRAI) सातत्याने नवे अपडेट्स जारी होत असतात. अशातच आता पुन्हा टीआरएआयचे नवे नियम (TRAI New Rule) लागू होणार आहेत. देशभरातील दूरसंचार सेवांच्या सुधारणा करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने नवीन दूरसंचार नियम लागू करण्याचे आदेश दिले आहेत.

मुंबई : अनेकांना बर्फाचा होळा, बर्फाचे आईस्क्रीम खाण्यास आवडते. परंतु असे काही जण असतात ज्यांना फक्त बर्फ चघळायला किंवा खायला (Ice Eating Habit) आवडते. मात्र बर्फ ...
मिळालेल्या माहितीनुसार, सध्या वेगवेगळ्या राज्यामध्ये परवानगीसाठी वेगवेगळे नियम आणि शुल्क आहेत, ज्यामुळे कंपन्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र आता मोबाईल नेटवर्कसाठी लागणाऱ्या इन्फ्रास्ट्रक्चर उभारणीसाठी 'राईट ऑफ वे' (RoW) हा नवीन नियम लागू करण्यात येणार आहे. यामुळे देशभरातील सर्व दूरसंचार कंपन्यांना एकसमान शुल्क आकारण्यात येणार आहे.
दरम्यान, हे नियम जिओ (JIO), एअरटेल (Airtel), बीएसएनएल (BSNL) आणि व्होडाफोन-आयडिया (Vi) या कंपन्यांसाठी लागू होणार असून नववर्षापासून टीआरएआयची नवी नियमावली जारी होणार आहे.
काय फायदा होणार?
ROW नियमानुसार, परवानगी मिळवण्याची प्रक्रिया डिजिटल पद्धतीने होणार आहे. यामुळे राज्य सरकारांकडून दिल्या जाणाऱ्या परवानग्यांमध्ये पारदर्शकता येणार असून प्रक्रिया जलद व सोपी होईल. तसेच 5G टॉवर्सच्या उभारणीला गती मिळणार आहे.
मोबाईल वापरकर्त्यांना काय लाभ होईल ?
- वेगवान नेटवर्क : 5G सेवेचा विस्तार जलद होईल.
- उत्तम कनेक्टिव्हिटीः देशभरात नेटवर्कची गुणवत्ता सुधारेल.
- पारदर्शक सेवाः डिजिटल परवानगी प्रक्रियेमुळे ग्रहिकांना अखंड सेवा मिळेल. (TRAI New Rule)