मुंबई : राज्यभरात सुरु असणाऱ्या विधानसभा निवडणुकीचा (Assembly Election 2024) निकाल काल जाहीर झाला. यामध्ये घवघवीत यशाने महायुतीचे सरकार विजयी झाले आहे. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधील सर्व राजकीय उमेदवारांनी भरघोस मतांनी यश मिळवले आहे. अशातच उद्या नव्या सरकारचा शपथविधी देखील होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, आज मुंबईत राष्ट्रवादीच्या आमदारांची पार पडलेल्या बैठकीमध्ये राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी अजित पवारांची (Ajit Pawar) निवड झाली आहे.
दरम्यान, मविआचा पराभव करत महायुतीला या निवडणुकीत २२० पेक्षा जास्त जागांवर यश मिळाले आहे. या निवडणुकीत अजित पवार गटाला देखील चांगलं यश मिळाले आहे. अजित पवार गटाने या निवडणुकीत केवळ ५३ ठिकाणी उमेदवार दिले होते. त्यापैकी तब्बल ४१ जागांवर अजित पवार गटाच्या उमेदवारांचा विजय झाला आहे.