Tuesday, February 11, 2025
Homeताज्या घडामोडीLivestock census : हिंगोली जिल्ह्यात उद्यापासून पशुगणनेला प्रारंभ!

Livestock census : हिंगोली जिल्ह्यात उद्यापासून पशुगणनेला प्रारंभ!

हिंगोली : २१ व्या पंचवार्षिक पशुगणनेस (Livestock census) उद्यापासून प्रारंभ होणार आहे. यामोहिमेत गाय, म्हैस, शेळी-मेंढी, अश्व, वराह, कुक्कुट आदि प्रजातीच्या जाती, लिंग व वय निहाय गणना करण्यात येणार आहे. पशुगणना करणाऱ्या प्रगणकांना जिल्ह्यातील नागरिकांनी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. एस. पी. खुणे, सहायक आयुक्त डॉ. आर. ए. कल्यापुरे यांनी केले आहे. (Pashu Ganana)

नववर्षाच्या सुरुवातीला लागू होणार TRAIचे ‘हे’ नवे नियम!

पशुसंवर्धन (Animal Husbandry) व दुग्धव्यवसाय विभागामार्फत (Dairying Department) दर ५ वर्षांनी राज्यातील पशुधनाची गणना करण्यात येते. सदर पशुगणना २५ नोव्हेंबर २०२४ ते २८ फेब्रुवारी २०२५ पर्यंत पूर्ण करण्याच्या केंद्र शासनाच्या सूचना आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व पशुसंवर्धन अधिकारी व कर्मचारी यांना सविस्तर सूचना व प्रशिक्षण देण्यात आले असून ग्रामीण भागासाठी ७४ आणि शहरी भागासाठी ९ असे एकूण ८३ पशुगणनेसाठी प्रगणक, तर ग्रामीण भागाकरिता २२ आणि शहरी भागासाठी ५ असे एकूण २७ पर्यवेक्षक नेमण्यात आले आहेत.

प्रगणकाव्दारे गोळा होणारी माहिती ही शासकीय योजनासाठी महत्त्वाची ठरणार असल्याने पशुपालकांनी आपल्याकडील जनावराची माहिती प्रगणकांना देण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. (Livestock census)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -