मुंबई: दोन राज्यांमधील विधानसभा, १५ राज्यांमधील ४० जागांवर विधानसभा पोटनिवडणूक आणि दोन लोकसभेच्या जागांसाठी झालेल्या मतदानाचे निकाल शनिवारी जाहीर झाले. लोकसभा निवडणुकीनंतर अर्ध्या भारतीयांचा कल दाखवणारा हा निकाल आहे. येथे सकाळपासून वादळ, सुनामी अशा चर्चा होत होत्या. याचे कारण म्हणजे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक.
या निवडणुकीत विरोधी पक्षांचा धुरळाच उडाला. येथे जितक्या जागा विरोधी पक्षाला मिळाल्या त्यापेक्षा दुपटीने अधिक जागा एकट्या भाजपने मिळवल्या. राज्यात विरोधी पक्ष बनण्याइतक्या जागाही महाविकास आघाडीच्या नेत्यांना मिळवत्या आल्या नाहीत. पन्नास वर्षांच्या इतिहासात महाराष्टात एखाद्या युतीने मिळवलेला हा जबरदस्त विजय आहे.
फक्त महाराष्ट्राबद्दल बोलायचे झाल्यास २०१४मध्ये २७.८ टक्के आणि १२२ जागा. २०१९मध्ये २५.८ टक्के आणि १०५ जागा. २०२४मध्ये २६ टक्के आणि १३० पेक्षा अधिक जागा. भाजप असा एकमेव पक्ष आहे ज्यांनी राज्यात सलग तीन विधानसभा निवडणुकीत १००हून अधिक जागा निवडल्या आहेत. यावेळेस तर भाजपचा स्ट्राईक रेट ८८ टक्क्यांपेक्षा अधिक आहे. म्हणजेच पक्षाने १४९ जागा लढवून १३१ जागा जिंकल्या आहेत.
भाजपचा पोटनिवडणुकीत जबरदस्त विजय
भाजपने केवळ राज्यातच नव्हे तर १५ राज्यांतील ४८विधानसभेच्या पोटनिवडणुकीतही विजय मिळवला आहे. भारतीय जनतेने भाजप आणि युतीवर पुन्हा एकदा विश्वास टाकला आहे. काँग्रेसकडे या पोटनिवडणुकीआधी १३ जागा होत्या. त्यांना केवळ ७ जागाच वाचवता आल्या. तर भाजपकडे आधी केवळ ११ जागा होत्या. मात्र आता भाजपची संख्या २०वर पोहोचली आहे. तर एनडीएच्या खात्यात ४८ पैकी २८जागा आहेत. भाजप आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उत्तर प्रदेश, बिहार आणि राजस्थानातील आपला दबदबा कायम राखला.
Rane Factor : सिंधुदुर्गात ‘राणे फॅक्टर’च! उबाठा सेनेचा केला सूफडा साफ
झारखंडमध्ये हेमंत सोरेन यांची सत्ता कायम
झारखंड विधानसभा निवडणुकीत निकालाबाबत बोलायचे झाल्यास झारखंड मुक्ती मोर्चाचे नेतृत्व करणार INDIA आघाडीने जबरदस्त कामगिरी करत बहुमत मिळवले. झारखंडमध्ये इडिया आघाडीला ५६ जागा मिळाल्या. तर एनडीएला २४ जागांवर विजय मिळवता आला. झारखंडने २४ वर्षांची जुनी परंपरा मोडली आणि सत्तारूढ पक्षाने जोरदार कमबॅक केले.