नाशिक : नाशिक शहरातील (Nashik News) पूर्व मतदारसंघांमध्ये भाजपला (BJP) घवघवीत यश मिळाल्या त्यामुळे हा मतदारसंघ भाजपकडे कायम राहिला.
Assembly Election 2024 : नाशिक पश्चिममधून भाजपाच्या सीमा हिरे विजयी
नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातून (Assembly Election 2024) भाजपाचे विद्यमान आमदार एडवोकेट राहुल ढिकले (Rahul Dhikale) हे पुन्हा एकदा विजय झाले आहेत त्यांनी या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे गणेश गीते यांचा दारुण पराभव केला. गणेश गीते यांनी भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसची वाट धरली होती. या ठिकाणी भाजपचा पराभव व्हावा यासाठी गीते यांनी जंग जंग पछाडले पण त्यांना यश आले नाही.
गिते यांनी आपण गिरीश महाजन यांचे शिष्य असल्याचे सांगून प्रचार केला होता. त्यामुळे या प्रकरणात गिरीश महाजन यांना स्पष्ट खुलासा करावा लागला होता तर गीते यांनी पैसे वाटून मोठ्या प्रकार केल्यामुळे या ठिकाणी दोन वेळा हाणामारीचे प्रकार देखील झाले होते त्यातून पैसे देखील जप्त करण्यात आले आहे.