वरळी विधानसभा (अकरावी फेरी)
ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे ४२ हजार ०७५ मते
शिंदे गटाचे मिलिंद देवरा ३७ हजार ४१३ मते
मनसेचे संदीप देशपांडे १४ हजार ९५० मते
आदित्य ठाकरे ४ हजार ६६२ मतांची आघाडी
मुंबई : महाराष्ट्रात (Maharashtra assembly election 2024) महायुतीची लाट दिसत असून भाजपाने १३० जागांवर आघाडी घेतली आहे. शिवसेना (शिंदे) ५७ आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) ३९ जागांवर आघाडी कायम ठेवून आहे.
संजय राऊत यांनी शिवसेनेची वाट लावली. माझ्या मतदारसंघातील सर्व आमदार महायुतीचे निवडून जनतेने उद्धव आणि संजयला औकात दाखवली आहे. आता त्यांनी तोंड दाखवू नये, संजयचा तर पार काळा कोळसा केल्याचे खासदार नारायण राणे यांनी सांगितले.
महायुतीला मिळालेले यश म्हणजे महायुती सरकारने केलेल्या विकासकार्यावरील जनतेच्या विश्वासाचे प्रतिक
‘लाडकी बहिण’सारख्या योजनांना लाभार्थींपर्यंत पोहोचवण्यासाठी राबणारे लाखो कार्यकर्ते तसेच शासनाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही दिले यशाचे श्रेय
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीला मिळालेले अभूतपूर्व यश हे राज्यातील जनतेने महायुतीच्या विकासकामे तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सक्षम नेतृत्वावर व्यक्त केलेल्या विश्वासाचे प्रतिक आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महायुतीच्या प्रत्येक लोकप्रतिनिधी, कार्यकर्त्यानी गेल्या अडीच वर्षात केलेल्या कष्टातून आज हे यश मिळाले आहे. महायुती सरकारने आणलेल्या ‘लाडकी बहिण’सारख्या अनेक योजनांना लाभार्थींपर्यंत पोहोचवण्यासाठी महायुतीचे लाखो कार्यकर्ते राबले तसेच शासनाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही मनापासून काम केले, त्या सर्वांना या यशाचे श्रेय जाते. महायुतीच्या उमेदवारांना मतदारांनी आमच्या अपेक्षेपेक्षा कितीतरी अधिक भरभरुन मतदान केले. राज्यातल्या समस्त जनतेने विश्वासाने एकमुखी पाठिंबा दिला. या सर्व मतदारांचे, नागरिकांचे अजित पवार यांनी मनापासून आभार मानले.
नाशिक जिल्ह्यातील १५ पैकी बऱ्याच मतदारसंघाचे चित्र स्पष्ट होण्यास सुरुवात झाली आहे. अशातच आता जिल्ह्यातील भाजपeचा पहिला निकाल हाती आला असून नाशिक पश्चिममधून सीमा हिरे विजयी झाल्या आहेत.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या पराभव झाला आहे. महायुतीचे उमेदवार अमोल खताळ यांनी बाळासाहेब थोरात यांच्या पराभव केला.
अमोल खताळ यांनी काही काळ राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार पक्षात देखील काम केले होते. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. ते विखे समर्थक मानले जातात आणि विधानसभा निवडणुकीत त्यांना शिंदे गटाकडून ऐनवेळी तिकीट मिळाले होते. महायुतीकडून या जागेसाठी माजी खासदार सुजय विखे इच्छुक होते.
अजित पवार यांनी देखील बारामती विधानसभा मतदारसंघातून बाजी मारली आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाचे उमेदवार युगेंद्र पवार यांचा पराभव केला आहे.
कसबा विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा पराभव केला आहे. कसबा विधानसभा मतदारसंघात भाजपचे हेमंत रासने १९,३२० मतांनी विजयी झाले आहेत.
महाविकास आघाडीला या विधानसभा निवडणुकीमध्ये मोठे धक्का बसले आहे. नगर जिल्ह्यात तिन्ही माजी मंत्र्यांचा पराभव झाला आहे. नेवासा मतदारसंघातून गडाख, राहुरी विधानसभा मतदारसंघातून तनपुरे आणि संगमेनर विधानसभा मतदारसंघातून थोरात यांचा पराभव झाला आहे. तर कराड दक्षिणमधून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव झाला आहे.
माहीम विधानसभा मतदारसंघात होऊ घातलेल्या तिरंगी लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या हाती येत असलेल्या कलांनुसार अमित ठाकरे प्रचंड पिछाडीवर आहेत.
प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांना मोठा धक्का बसला आहे. अचलपूर विधानसभा मतदारसंघातून ते तिसऱ्या स्थानावर फेकले गेले आहेत. महायुतीला आव्हान देणारे बच्चू कडू यांना पराभवाचा सामना करावा लागत आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विद्यमान आमदार बाळासाहेब थोरात संगमनेरमध्ये पराभवाच्या छायेत आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार शिंदे सेनेचे अमोल खताळ पंधराव्या फेरीनंतर ११०३२ मतांनी आघाडीवर आहेत. मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून खताळ यांनी आपली आघाडी कायम ठेवली आहे त्यामुळे थोरात पराभवाच्या छायेत आहेत. काँग्रेसकडून मुख्यमंत्री पदाचे दावेदार असलेल्या थोरात यांनी आजवर सलग आठ वेळा विजय मिळवला होता.
अमित साटम (भाजपा) – ५०,९८९
अशोक जाधव (कॅांग्रेस) – ४८४२१
अमित साटम २५६८ मतांनी आघाडीवर
महायुतीने विधानसभा निवडणुकीत २१७ जागांवर आघाडी घेतली आहे. महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालेय. महाराष्ट्रातील मतदारांचे आभार मानतो. लाडकी बहीण, लाडके भाऊ, लाडके शेतकरी यांच्यामुळे आमचा विजय होत आहे. तसेच संपूर्ण निकाल लागल्यानंतर मुख्यमंत्रीपदाबाबत आम्ही तीनही पक्ष एकत्र बसून पुढचा निर्णय घेऊ, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे ४२ हजार ०७५ मते
शिंदे गटाचे मिलिंद देवरा ३७ हजार ४१३ मते
मनसेचे संदीप देशपांडे १४ हजार ९५० मते
आदित्य ठाकरे ४ हजार ६६२ मतांची आघाडी
प्रकाश फातरपेकर – ३०२३७
तुकाराम काते- ३५३७९
माऊली थोरवे- ४२५८
दीपक निकाळजे- ५७८६
वंचीत- ५३५३
अजित पवार यांनी बारामती विधानसभा मतदारसंघात जोरदार मुसंडी मारली आहे. आठव्या फेरीअखेर अजित पवारांनी ७३,०२५ मते मिळवली आहेत. त्यांच्याकडे ३८ हजारांची आघाडी आहे.
महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या २८८ विधानसभा मतदारसंघाच्या (Maharashtra assembly election 2024) मतमोजणीला सकाळपासून सुरूवात झाली आहे. मतदार राजा सत्तेत असलेल्या महायुतीला कौल देणार की महाविकास आघाडीला निवडणार आहे हे मतमोजणीदरम्यान स्पष्ट होईल.
राज्यातील मतदार सत्तेची चावी कोणाच्या हातात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. यंदाच्या पोल एक्झिटमध्ये कोणाचेच एकमत पाहायला मिळाले नाही. काहींनी महायुतीच्या पारड्यात अधिक जागा टाकल्या तर काहींनी महाविकास आघाडीला अधिक मते मिळतील असे भाकीत केले. त्यामुळे यंदाची ही निवडणूक जबरदस्त ठरणार आहे.
त्यात मनसेचा फॅक्टर कितपत प्रभावी ठरतो हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं आहे. या निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी चांगलाच जोर लावला. त्यांनी संपूर्ण राज्यात आपले उमेदवार उभे केले होते. त्यामुळे लोक पुन्हा मनसेवर विश्वास टाकतात की इतर काय होते ते पाहणं गरजेचं आहे.
शिवसेनेचे शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटात विभाजन, त्यापाठोपाठ अजित पवार यांनी काकांचा हात सोडून भाजप महायुतीला साथ देणे, या अनेक कारणांमुळे ही विधानसभा निवडणूक चांगलीच गाजली आहे. त्यामुळे या गोष्टींचा कितपत परिणाम या विधानसभेवर होतो ते पाहावे लागेल.
याआधीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी सर्वाधिक मतदान पाहायला मिळाले आहे. मतदानाचा आकडा यंदा अधिक होता.
दरम्यान, लोकसभेच्या तुलनेत यंदाच्या विधानसभेत महिलांच्या मतदानाचा आकडा वाढल्याचे पाहायला मिळाले. लोकसभेला २ कोटी ६३ लाख ६६ हजार महिलांनी मतदान केले होते. त्या तुलनेत विधानसभेला ३ कोटी ६ लाख ३१९ हजार महिलांनी मतदान केले.
२८८ विधानसभा मतदारसंघ असलेल्या राज्यात बहुमतासाठी पक्षांना १४५चा आकडा पार करणे गरजेचे आहे. त्यामुळे मतदार राजा कोणाच्या पारड्यात ही मते टाकणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
नवी दिल्ली : देशातील सर्वात स्पर्धात्मक परीक्षांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या UPSC CSE मध्ये दरवर्षी…
मुंबई : 'मुंबईतील लँड स्कॅमचा बादशाह जर कोणी असेल, तर तो उद्धव ठाकरेच!' अशा शब्दांत…
कोविड महामारी दरम्यान संसर्ग झालेल्या लोकांना हृदयरोगांचा धोका सर्वाधिक मुंबई: गेल्या वर्षातील आकडेवारी पाहिल्यास असे…
पुणे : विद्येचं माहेरघर असणाऱ्या पुण्यात गुन्हेगारीचं क्षेत्र वाढतं चाललं आहे. दररोज कोणत्या ना कोणत्या…
मुंबई : झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवर पाच वर्षांपूर्वी 'देवमाणूस' (Devmanus) ही मालिका सुरु झाली…
मुंबई: "भिऊ नको मी तुज्या पाठीशी आहे" संकट काळात स्वामी समर्थांच हे वाक्य जगण्यासाठी नवी…