Saturday, May 10, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूजनाशिक

Assembly Election Result : नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपाचा तिसऱ्यांदा विजय!

Assembly Election Result : नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपाचा तिसऱ्यांदा विजय!

नाशिक : नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघांमध्ये (Assembly Election Result) भाजपाला (BJP) लागोपाठ तिसऱ्यांदा विजय मिळाला आहे. भाजपाचे विद्यमान आमदार प्राध्यापक देवयानी फरांदे (Devayani Pharande) यांनी पुन्हा एकदा विजय संपादन केला आहे. पहिल्या यादीनंतर त्यांना तिकीट देण्यात आले. त्यामुळे देवयानी फरांदे यांना प्रचाराची कमी संधी मिळाली. मात्र त्यातूनही त्यांनी आपले प्रतिस्पर्धी उबाठा गटाचे वसंत गीते यांचा सुमारे ३० हजार मतांनी पराभव केला आहे.



उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार वसंत गीते हे सुरुवातीला प्रचारात आघाडीवर होते. परंतु विरोधकांकडून अडचणीत आणण्यासाठी त्यांच्यावर ड्रग्स रॅकेटमध्ये सहभागी असल्याचा आरोप देखील करण्यात आला होता. असे असताना देखील नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघांतून प्राध्यापक देवयानी फरांदे विजयी झाले आहेत.

Comments
Add Comment