Sunday, February 9, 2025
Homeताज्या घडामोडीSaudi Arebia : 'या' देशाने एका वर्षात १०१ विदेशी नागरिकांना लटकवले फासावर!

Saudi Arebia : ‘या’ देशाने एका वर्षात १०१ विदेशी नागरिकांना लटकवले फासावर!

रियाध: गेल्या काही काळापासून सौदी अरेबिया हा देश बराच चर्चेत आहे. आपली पारंपरिक विचारसरणी सोडून त्यांनी आधुनिकतेची कास धरली आणि त्यादृष्टीनं बरेच बदल त्यांनी आपल्या देशात घडवले आहेत. आपल्या देशात विकासाचे अनेक प्रकल्प त्यांनी आणले आणि अजूनही अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प टप्प्यात आहेत. या प्रकल्पांद्वारे त्यांनी अख्ख्या जगाचा निधीही आपल्या देशाकडे वळवायला घेतला आहे. पण या देशाची प्रतिगामी ही प्रतिमा अजूनही पुरेशी बदललेली नाही. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे यंदा सौदीमध्ये एकाच वर्षात तब्बल शंभरपेक्षाही अधिक विदेशी नागरिकांना फाशीची शिक्षा देण्यात आली.

१ जानेवारीपासून बदलणार टेलिकॉमचा हा नियम, Jio, Airtel, BSNL,Viवर सरळ होणार परिणाम

आतापर्यंत एकाच वर्षांत सौदीमध्ये इतक्या विदेशी नागरिकांना यापूर्वी फाशी देण्यात आलेली नव्हती. त्यामुळे सौदीचं नाव सध्या जगात गाजतं आहे. काही दिवसांपूर्वीच सौदीमध्ये एका येमेनी नागरिकाला फाशी देण्यात आली. ड्रग तस्करीच्या आरोपात त्याला अटक करण्यात आली होती. तो ‘दोषी’ आढळल्यानं त्याला फासावर लटकवण्यात आलं. यंदा फाशी दिलेला तो १०१वा विदेशी नागरिक आहे. गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत विदेशी नागरिकांना फाशी दिल्याचा हा आकडा तब्बल तीन पटींनी अधिक आहे. सौदीत गेल्या वर्षी आणि २०२२ मध्ये ३४ विदेशी नागरिकांना मृत्यूदंड दिला गेला होता.इथे ज्या नागरिकांना फासावर लटकवण्यात येतं, त्यात मुख्यत्वे ड्रग तस्करीच्या आरोपींचा सर्वाधिक समावेश आहे. अमली पदार्थांसंबंधीचे या देशातले कायदे जगात सर्वांत कडक आहेत, असं मानलं जातं.

यंदा सौदीत ज्या विदेशी नागरिकांना फाशी देण्यात आली, त्यात पाकिस्तानचे २१, येमेनचे २०, सिरियाचे १४, नायजेरियाचे १०, इजिप्तचे नऊ जॉर्डनचे आठ तर इथियोपियाच्या सात नागरिकांचा समोवश आहे. याशिवाय सुदान, भारत आणि अफगाणिस्तानचे प्रत्येकी तीन तर श्रीलंका, इरिट्रिया आणि फिलिपाइन्सच्या प्रत्येकी एका नागरिकाला फासावर लटकावण्यात आलं आहे. या सर्वच देशांनी त्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -