Sunday, February 9, 2025
Homeसंपादकीयविशेष लेखShare Market : स्कॅलपिंग अर्थात डे ट्रेडिंग

Share Market : स्कॅलपिंग अर्थात डे ट्रेडिंग

स्कॅल्पिंग ही एक ट्रेडिंग शैली आहे. स्कॅल्पिंग हा एक शब्द आहे ज्याचा वापर डे ट्रेडिंगमध्ये लहान नफ्यातून उच्च व्हॉल्यूम कमावण्याच्या धोरणासाठी केला जातो. उदा. शेअर्स, इंडेक्स, कमोडिटी, करन्सी. येथे सोयीसाठी शेअर्स विचारात घेतले आहेत. भावात पडणाऱ्या छोट्याशा फरकाचा लाभ डे ट्रेडर्सकडून मिळवला जातो. एक किंवा त्याहून अधिक कंपन्यांच्या शेअर्सचे अनेक छोटे-छोटे ट्रेंड दिवसभरात घेतले जातात.

उदय पिंगळे

शेअर बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे गुंतवणूकदार आहेत. ते करीत असलेल्या सर्व व्यवहारांना ट्रेडिंग असे म्हटले जाते. त्यांच्या गुंतवणूक करण्याच्या कालावधीवरून ते अल्प, मध्यम आणि दीर्घकालीन गुंतवणूकदार आहेत असे समजले जाते. या कालावधीची निश्चित सीमारेषा नाही. आयकर कायद्यानुसार शेअर्समध्ये किमान एक दिवस ते एक वर्ष या कालावधीकरता केलेली गुंतवणूक अल्पकालीन तर त्याहून अधिक कालावधीसाठी केलेली गुंतवणूक ही दीर्घकालीन गुंतवणूक समजण्यात येते, त्यावर सवलतीच्या दराने कर आकारणी होते. त्यामुळेच काही व्यक्ती हिशोबी जोखीम (Calculated Risk) घेऊन भांडवल बाजारात गुंतवणूक करण्यासाठी तयार होतात. व्यक्ती जितकी जास्त जोखीम घेऊ शकते त्यावर नफा किंवा नुकसान कमी अधिक होण्याची शक्यता असते. काही लोक आपले व्यवहार त्याच कामकाजाच्या दिवसात पूर्ण करतात त्यास डे ट्रेडिंग म्हणतात. त्यांचा गुंतवणूक करण्याचा कालावधी हा एका सेकंदाचा छोटा भाग ते पूर्ण कामकाजाचा दिवस असा असतो. भावातील फरकाचा लाभ उठवून कमीत कमी वेळात अल्प भांडवलावर अधिक नफा मिळवणे हे त्यांचे उद्दिष्ट असते. यातून मिळालेले उत्पन्न हे अन्य मार्गाने मिळालेले उत्पन्न समजून त्यावर नियमितदराने कर आकारणी होते. एखाद्या व्यक्तीचा शेअर्स खरेदी विक्री करणे हाच व्यवसाय असल्यास त्यास कायद्याने उपलब्ध असलेल्या व्यावसायिक खर्चाच्या वजावटी घेता येतात. पूर्वी या संबंधात अनेक वाद निर्माण झाल्याने त्यावर उपाय म्हणून शेअर खरेदी विक्री करणे ही गुंतवणूक आहे की व्यवसाय हे जाहीर करण्याचे स्वातंत्र्य करदात्यांना
मिळाले आहे.

आज आपण स्कॅलपिंग म्हणजे काय हे जाणून घेणार आहोत. ही एक डे ट्रेडिंगचीच पद्धत आहे. ज्या ज्या मालमत्ता प्रकारात उदा शेअर्स, इंडेक्स, कमोडिटी, करन्सी डे ट्रेडिंग होऊ शकते, त्यात स्कॅल्पिंग करता येते. उदा. शेअर्स, इंडेक्स, कमोडिटी, करन्सी. येथे सोयीसाठी शेअर्स विचारात घेतले आहेत. भावात पडणाऱ्या छोट्याशा फरकाचा लाभ डे ट्रेडर्सकडून मिळवला जातो. एक किंवा त्याहून अधिक कंपन्यांच्या शेअर्सचे अनेक छोटे छोटे ट्रेंड दिवसभरात घेतले जातात. सकाळी मार्केट चालू झाल्यावर शेअर्स खरेदी अथवा विक्री करून आपले उद्दिष्ट पूर्ण होईपर्यंत किंवा पोझिशन स्क्वेअर अप करण्याच्या वेळेपर्यंत अथवा स्टॉपलॉस हिट होईपर्यंत वाट पाहणे त्यांना मान्य असते. आपला व्यवहार ते चुकूनही डिलिव्हरीमध्ये बदलून घेत नाहीत. त्यांचे टार्गेट आणि स्टॉपलॉस हे अन्य डे ट्रेडर्सच्या तुलनेत अत्यंत छोटे असतात. त्याचे गणिताचे ज्ञान पक्के असते भावात किती फरक पडला की आपल्याला सर्व खर्च वजा जाऊन फायदा होईल (Breakeven)अथवा तोटा होईल हे त्यांना निश्चित माहिती असते.

निवडणुका संंपल्या; आता विकासावर बोला!

या पद्धतीचे फायदे-तोटे असे –

फायदे :
व्यवहार संख्या अधिक त्यामुळे मोठ्या प्रमाणात नफा होण्याची शक्यता.
स्टॉप लॉसचा वापर करीत असल्याने व्यवहार जोखीम कमी.
बाजार दिशेनुसार व्यवहारातली लवचिकता.
बाजाराकडे लक्ष ठेवून असल्याने व्यवहारांकडे नावीन्यपूर्ण पद्धतीने पाहण्याची दृष्टी.

तोटे :
ट्रेड विरोधात गेल्यास जादा जोखीम.
ब्रोकरेज आणि अन्य चार्जेस अधिक द्यावे लागणे.
पूर्ण लक्ष ठेवावे लागत असल्याने अधिक वेळ घेणारे.
मानसिक ताण येण्याची शक्यता.
बाजारातील अस्थिरता त्यामुळे निर्णय चुकण्याची शक्यता.
कमी व्यवहार होणाऱ्या शेअर्समध्ये तरलतेचा अभाव.

स्कॅलपिंगची वैशिष्ट्ये :
अत्यल्प व्यवहार कालावधी – हे व्यवहार काही सेकंद ते काही मिनिटे या कालावधीचे असतात.
अधिक व्यवहार वारंवारता – कालावधी कमी असल्याने एक वा अनेक कंपन्यांच्या शेअर्समध्ये वारंवार एकसारखे अधिक व्यवहार केले जातात.
अत्यल्प नफा उद्दिष्ट – यातील बहुतेक सर्व व्यवहार अत्यल्प नफा मिळवण्यासाठी केले जातात.
तांत्रिक विश्लेषणाचा वापर – स्कॅल्पिंग व्यवहार करताना तांत्रिक विश्लेषण उपयोगी पडत असल्याने स्कॅलपिंगर त्याचा प्रामुख्याने वापर करतात.

लोकप्रिय स्कॅलपिंग तंत्रे :
रेंज ट्रेडिंग – शेअर्सची किंमत पातळी ओळखून त्याच दरम्यान व्यवहार करणे.
ट्रेंड फॉलोइंग – शेअर्सचा कल ओळखून त्यानुसार व्यवहार करणे.
ब्रेकआउट ट्रेडिंग – अचानक होणाऱ्या भावातील बदल ओळखून व्यवहार करणे.
मिन रिव्हर्शन – शेअर्सची किंमत कालांतराने सरासरी किमतीत बदलते ते ओळखून व्यवहार करणे.

स्कॅलपिंगसाठी आवश्यक कौशल्ये :
बाजार ज्ञान – स्कॅलपिंग म्हणून काम करण्यासाठी बाजाराचे सखोल ज्ञान असणे गरजेचे आहे.
तांत्रिक विश्लेषण – निर्णय घेण्यासाठी विविध तांत्रिक गोष्टींचा विचार केला जात असल्याने या विषयाचे ज्ञान असणे गरजेचे आहे.
जोखीम व्यवस्थापन – कोणत्याही गुंतवणुकीसाठी हे आवश्यक असल्याने स्कॅलपिंगसाठीही त्याची गरज आहे.
शिस्त – आपल्या गुंतवणूक धोरणाचे तंतोतंत पालन करण्याची शिस्त अंगीकारायला हवी.
तत्काळ निर्णय घेण्याची क्षमता – भाव क्षणार्धात वरखाली होत असल्याने निर्णय झटपट घेण्याचे कौशल्य असायला हवे. यात एक चूक म्हणजे आर्थिक नुकसानच.

स्कॅलपिंग सुरू करण्यासाठी आवश्यक गोष्टी :
योग्य ट्रेडिंग प्लॅटफॉर्म – किमान ब्रोकरेज लागेल ज्यामुळे व्यवहार खर्च कमी होईल असा ब्रोकर निवडणे.
स्निश्चित असा ट्रेडिंग प्लॅन – व्यवहार करताना कोणत्या पातळीवर करायचा स्टॉप लॉस एन्ट्री एक्सिट कुठे घेणार या बद्धल संदिग्धता नसावी.
सराव मंच – सरावासाठी अनेक ट्रेडिंग प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत यात प्रत्यक्ष पैशांशी संबंध येत नसल्याने व्यवहार करण्यात कोणताही धोका नाही.
व्यवहार पातळी – सुरुवातीस छोटे आणि कमी संख्येने व्यवहार करून त्यांचे प्रमाण वाढवावे.
डे ट्रेडिंग हे दुय्यम दर्जाचे आहे असे गुंतवणूक तज्ज्ञ समजतात, असे असले तरी ही एक गुंतवणूक करण्याची सर्वमान्य पद्धत आहे. डे ट्रेडर्स असल्यामुळे बाजाराचा भाव फलक सतत हलता राहतो, व्यवहार संख्या वाढते. शेअर बाजारात बहुसंख्य व्यवहार याच प्रकारात होतात. सरकारला कर मिळतो. स्कॅलपिंग करण्यासाठी जोखीम – प्रतिफळ संबंध (Risk Reward Ratio) याचबरोबर ट्रेडिंगवर समर्पितता (Delegation), शिस्त (Discipline) आणि सतत शिकत राहण्याची इच्छाशक्ती असण्याची गरज आहे. योग्य माहितीअभावी डे ट्रेडिंग करणे अत्यंत जोखमीचे आहे. यासाठी आपल्या तज्ज्ञ सल्लागाराचे मत जाणून घ्या.

[email protected]

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -