मुंबई : बिग बॉस फेम सना खानने (Sana khan) सोशल मीडियावर चाहत्यांना एक गुड न्यूज दिली आहे. सना खान पुन्हा एकदा आई होणार आहे. सनाने नुकतीच एक विडिओ शेअर केली असून त्यात तिने दुसऱ्यांदा तिची गर्भधारणा जाहीर केली आहे. ग्लॅमर इंडस्ट्रीचा सना खानने जेव्हापासून निरोप घेतला आहे, तेव्हापासून ती पूर्वीपेक्षा जास्त चर्चेत आली आहे. सनाने केवळ रूपच बदलले नाही तर तिची विचार करण्याची पद्धत पूर्णपणे बदलली आहे.
आता सना खानचे आयुष्य फक्त तिचे पती अनस सैय्यद आणि मुलगा सय्यद तारिक जमील इतकंच आहे. मात्र आता तिच्या आयुष्यात आणखी एका गोंडस बाळाचे आगमन होणार आहे. सोशल मीडियावर सनाने स्वतः एक व्हिडिओ शेअर करून तिच्या चाहत्यांना याची माहिती दिली आहे. २० नोव्हेंबर २०२० रोजी सनाचे लग्न झाले आणि ५ जुलै २०२३ रोजी तिने तिच्या पहिल्या मुलाला जन्म दिला. वर्षभरानंतर आता ती पुन्हा आई होणार आहे. ही बातमी ऐकूनचं चाहत्यांना खूप आनंद झाला आहे.
शेअर केला व्हिडीओ
अभिनेत्रीने व्हिडीओ पोस्ट केला त्यात लिहिले आहे की, ‘अल्लाहच्या कृपेने आमच्या ३ जणांचे कुटुंब आनंदाने चार जणांचं होणार आहे. अलहमदुलिल्लाह! एक छोटी प्रार्थना येत आहे. सय्यद तारिक जमील मोठा भाऊ होण्यासाठी खूप उत्साहित आहेत. प्रिय अल्लाह, आम्ही आमच्या नवीन आशीर्वादाचे स्वागत आणि कदर करण्यासाठी प्रतीक्षा करू शकत नाही. आम्हाला तुमच्या प्रार्थनेत ठेवा. अल्लाह आमच्यासाठी हे सोपे करो. जजकल्ला खैर.’ असे लिहून अभिनेत्रीने ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
View this post on Instagram
चाहत्यांनी केलं अभिनंदन
दरम्यान, सना खानची ही पोस्ट पाहून काही लोक आश्चर्यचकित झाले आहेत, तर काही लोक तिचे आणि तिच्या पतीचे अभिनंदन करताना दिसत आहेत. सना खानच्या चाहत्यांनी तिला या गुड न्यूजने खूप शुभेच्छा दिल्या आहेत. सोशल मीडियावर त्याची ही पोस्ट सर्वाधिक व्हायरल झाली असून प्रत्येकजण त्यावर बोलत आहे. आता सना खानच्या दुसऱ्या गोंडस बाळाची या जगात येण्याची सना, तिचं कुटुंब आणि सनाचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहे.