Adani Group : अदानींमुळे LIC ला १२,००० कोटींचा फटका!

  81

मुंबई : अमेरिकन न्यायालयाने गौतम अदानीसह (Gautam Adani) सह जणांवर लाच दिल्याचा आरोपाखाली दोषी ठरवल्यामुळे अदानी समुह गोत्यात अडकला आहे. फसवणूकीच्या (Bribery Case) आरोपामुळे काल अदानी समुहाचे सर्व शेअर २० टक्क्यांपर्यंत खाली कोसळल्यामुळे (Shares Fall) अदानी समुहासह गुंतवणूकदारांना झटका बसला. त्यानंतर आता अदानींमुळे एलआयसी'ला (LIC) देखील मोठा फटका बसला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, अदानी समूहाच्या शेअर्स (Adani Group Stock) गुंतवणूकदारांमध्ये एलआयसीचा देखील समावेश आहे. एलआयसीने अदानींच्या सात कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली होती. मात्र काल शेअर्समध्ये मोठी पडझड झाल्यामुळे एलआयसीला १२,००० कोटी रुपयांचे नुकसान झाले.


अदानी ग्रुप कंपनीच्या शेअर्समध्ये घसरण झाल्यानंतर एलआयसीला सुमारे ५ हजार कोटी रुपयांचा तोटा झाला. तसेच, एलआयसी अदानी एंटरप्रायझेसमध्येही अंदाजे ३ हजार कोटी रुपयांचा फटका बसला. याशिवाय, अंबुजा सिमेंटच्या शेअर्समुळे एलआयसीला १२०० कोटी रुपयांचे नुकसान झाले. या तीन मोठ्या नुकसानीसोबतच, अदानी टोटल गॅसमध्ये ८०७ कोटी रुपये, अदानी एनर्जी सोल्युशन्समध्ये ७१६.४५ कोटी रुपये, अदानी ग्रीन एनर्जीमध्ये ५९२ कोटी रुपये आणि एसीसीमध्ये ३८१ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.



अदानींविरुद्ध अटक वॉरंट जारी


दरम्यान, आता अदानी यांच्यावर आरोप न्याय विभागाच्या अंतर्गत गुन्हेगारी विभागाच्या उप सहायक अटॉर्नी जनरल लिसा एच मिलर यांनी केला असून याप्रकरणी रीतसर लेखी तक्रार पत्र देण्यात आले आहे. तसेच गौतम अदानी आणि सागर अदानी यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले आहे. (Adani Group)

Comments
Add Comment

Operation Akhal: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून चकमक सुरू, आतापर्यंत ३ दहशतवादी ठार; २ दहशतवाद्यांना घेराव

कुलगाम: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून लष्कराचे ऑपरेशन अखल सुरू आहे. याद्वारे एके-४७ रायफल, एके

लष्करी अधिकाऱ्याकडून स्पाइसजेटच्या कर्मचाऱ्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण, श्रीनगर विमानतळावर नेमके घडले काय?

एका कर्मचाऱ्याच्या पाठीच्या कण्याला फ्रॅक्चर आणि जबड्याला गंभीर दुखापत श्रीनगर: जम्मू काश्मीरमधील श्रीनगर

‘इस्राो’ची मंगळ तयारी

नवी दिल्ली : ३१ जुलै रोजी इस्रोने लडाखच्या त्सो कार या दुर्गम आणि मंगळ ग्रहासारख्या भासणाऱ्या प्रदेशात आपल्या

सैन्याच्या शौर्याचा काँग्रेसकडून सतत अपमान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाराणसीत आरोप वाराणसी  : ऑपरेशन सिंदूर पूर्णपणे यशस्वी झाले आहे, पहलगामचे

पाकिस्तानमधून आरडीएक्सने राम मंदिर उडवण्याचा मेसेज; गुन्हा दाखल

बीड : उत्तर प्रदेशातील अयोध्येतील श्री राम मंदिर उडवण्याचा मेसेज थेट पाकिस्तानातून बीड जिल्ह्यातील एका तरुणाला

इंडिगोच्या विमानात कानशिलात! पॅनिक अटॅक आलेला तरुण बेपत्ता!

मुंबई : मुंबईहून कोलकात्याकडे जाणाऱ्या इंडिगो एअरलाईन्सच्या फ्लाइटमध्ये एक धक्कादायक घटना घडली. पॅनिक अटॅकचा