Saturday, February 8, 2025
Homeताज्या घडामोडीगोदरेजकडून ‘द अप्लायन्सेस ऑन व्हील्स मोहिमे’चा शुभारंभ

गोदरेजकडून ‘द अप्लायन्सेस ऑन व्हील्स मोहिमे’चा शुभारंभ

मुंबई: गोदरेज कंपनीची वैविध्यपूर्ण उत्पादने ग्राहकांना पाहता यावी, याकरिता गोदरेज कंपनी नव्या संकल्पनेसह सज्ज झाली आहे. गोदरेज एन्टरप्रायजेस ग्रुपचा भाग असलेल्या ‘द अप्लायन्सेस बिझनेस ऑफ गोदरेज अँड बॉयन्स’कडून गोदरेजच्या उत्पादनांची माहिती देणाऱ्या ‘अप्लायन्सेस ऑन व्हील्स’ या मोहिमेचा शुभारंभ झाला आहे. गोदरेज टॅम्पोमध्ये गृहोपयोगी वस्तूंचे दर्शन देत प्रत्येक उत्पादनांची माहिती सांगणारी ही मोहीम गेल्या महिन्यातील ४ ऑक्टोबरपासून सुरु झाली आहे. या टेम्पो वाहनात गोदरेजची अत्याधुनिक आणि नवनवीन वैशिष्ट्यांची घरगुती उत्पादने ग्राहकांना पाहता येतील. गोदरेजची उत्पादने ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी हा टेम्पो राज्यभरातील प्रमुख २१ शहरांमधील ग्राहकांच्या भेटीला येणार आहे. या २१ शहरांपैकी तब्बल ४ हजार ग्राहकांना उत्पादनांची माहिती देण्याचा कंपनीचा संकल्प आहे. त्यासाठी तब्बल अडीच हजारांहून अधिक किलोमीटरचे अंतर कापत हा टॅम्पो तुमच्या शहरांत पोहोचेल.

https://prahaar.in/2024/11/22/adani-group-gets-another-blow-kenya-government-cancels-all-adani-projects/

गोदरेजच्या नावीन्यपूर्ण उत्पादनांचा संच असलेल्या या वाहनाला ‘इन्पायर हब’ या नावाने ओळखले जाईल. या टॅम्पोतील उत्पादनांचे प्रत्यक्षात वापर करण्याचे फायदे ग्राहकांपर्यंत पोहोचविले जातील, जेणेकरुन खरेदी करण्याचा सहजसोपा आणि आगळावेगळा अनुभव गोदरेजच्या ग्राहकांना मिळेल. ‘द अप्लायन्सेस ऑन व्हील्स’ या मोहिमेत सहभाग घेणाऱ्या ग्राहकांना प्रत्यक्षात उत्पादनांची गुणवत्ताही तपासता येईल. फ्रिज, वॉशिंग मशिन, एअर कंडिशन, डिश वॉशर, मायक्रॉवेव्ह ऑव्हन, एअर कूलर आणि डीप फ्रिजर आदी घरगुती वापरातील सर्व गोदरेजची उत्पादने एकाच ठिकाणी पाहता येतील. घरगुती वापरासाठी उपयुक्त या उत्पादनांच्या रचनेबद्दल ग्राहकांना संपूर्ण माहिती घेता येईल.

गोदरेज कंपनीच्या उत्पादनांतील अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराने ग्राहकांना कितपत फायदा होतोय, हे प्रत्यक्षात पाहता यावे, यासाठी कंपनीकडून या मोहिमेसाठी पुढाकार घेतला गेला आहे. राज्यभराचा दौरा करणाऱ्या गोदरेज इन्पायर या वाहनात घरगुती उत्पादनांची व्हर्चुअल माहिती दिली जाईल. ए.आय. तंत्रज्ञानाच्या मदतीने उत्पादनांमध्ये कितपत सुधारणा झाली आहे, हे ग्राहकांनी प्रत्यक्षात पाहता येईल, जेणेकरुन नजीकच्या दुकानांतून गोदरेज उत्पादने खरेदी करण्यास मदत होईल, असा विश्वास कंपनीकडून व्यक्त करण्यात आला.

गोदरेज इन्पायरला भेट देण्याचा ग्राहकांचा अनुभव अविस्मरणीय आणि आनंददायी ठरेल, यासाठी वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. वाहनाला भेट देणाऱ्या ग्राहकांसाठी गोदरेज कंपनीकडून खास ऑफरही उपलब्ध केल्या जातील. गोदरेज इन्पायरकडून आयोजित उपक्रमात ग्राहकांनी सहभाग नोंदविल्यास भेटवस्तू, व्हाउचर्स दिल्या जातील.

गोदरेज इन्पायर वाहनाला भेट देणाऱ्या अनेक ग्राहकांनी उत्पादनांची माहिती घेतल्यानंतर समाधान व्यक्त केले. उत्पादनांच्या गुणवत्तेबद्दल प्रशंसा केली. गोदरेच्या या आगळ्यावेगळ्या मोहिमेबद्दल मला मैत्रिणीकडून माहिती मिळाली. आपल्याच शहरात दौऱ्यावर असलेल्या गोदरेज इन्पायर वाहनाला भेट देत, घरगुती उत्पादनांची माहिती घेण्याची संकल्पना मला आवडली. वॉशिंग मशिनची खरेदी करण्याचा विचार होता, गोदरेजची विविध उत्पादने सहज पाहता येणार या उत्सुकतेपोटी मी गोदरेज इन्पायरला भेट दिली. सर्व घरगुती उत्पादनांची माहिती घेत, अखेरीस मी वॉशिंग मशिन खरेदी करण्याचा माझा निर्णय पक्का झाला. तो क्षण माझ्या संपूर्ण कुटुंबीयांसाठी अविस्मरणीय ठरला, या शब्दांत गोदरेज इन्पायर वाहनाला भेट दिलेल्या गृहिणीने कंपनीचे आभार व्यक्त केले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -