Friday, February 7, 2025
Homeब्रेकिंग न्यूजAdani Group : अदानी समूहाला पुन्हा धक्का ! केनियाकडून अदानींचे सर्व प्रकल्प...

Adani Group : अदानी समूहाला पुन्हा धक्का ! केनियाकडून अदानींचे सर्व प्रकल्प रद्द

केनिया : अमेरिका न्यायालयाने गौतम अदानी (Gautam Adani), सागर अदानी (Sagar Adani) आणि अझूर पॉवरच्या अधिकाऱ्यांना लाचखोरी प्रकरणात दोषी ठरवल्यामुळे अदानी समुहाचे सर्व शेअरर्समध्ये (Adani Group Shares) मोठी पडझड झाली. त्यामुळे अदानी समूहाला धक्का बसला होता. या धक्क्यातून सावरत असताना पुन्हा मोठा धक्का अदानी समूहाला बसला आहे.

Adani Group : अदानींमुळे LIC ला १२,००० कोटींचा फटका!

केनिया सरकारने (Kenya Government) अदाणी समूहाला दुसरा धक्का दिला आहे. केनियाच्या ऊर्जा मंत्रालयासोबत अदानी ग्रुप ७३.६ दशलक्ष डॉलर्स (सुमारे ६,२१५ कोटी रुपये) च्या ऊर्जा प्रकल्पाचा करार करण्याची तयारी अदानी ग्रुपकडून सुरू होती. याअंतर्गत अदानी ग्रुप केनियामध्ये पॉवर ट्रान्समिशन लाइन तयार करणार होता. परंतु, आता केनिया सरकारने हा करार रद्द करण्याचे निर्देश दिले आहेत, त्यामुळे अदानींना हा मोठा धक्का मानला जात आहे.

भ्रष्टाराचारामुळे केनिया सरकारने घेतला निर्णय

‘भ्रष्टाराचाराबद्दल समोर आलेले पुरावे आणि विश्वासार्ह माहितीच्या आधारावर मी निर्णय घेण्यास मी मागेपुढे पाहणार नाही’. केनियामध्ये ३० वर्षांपासून विमानतळाचे नियंत्रण करणाऱ्या कंपनीशी अदाणी समूहाने भागीदारी करत नैरोबीमधील मुख्य विमानतळाचे आधुनिकीकरण करण्यासाठी करार केला होता. अतिरिक्त धावपट्टी आणि टर्मिनल बांधून देण्यासाठी करारावर स्वाक्षऱ्या झाल्या होत्या.

त्याचबरोबर अदाणी समूहाशी भागीदारी केल्यामुळे केनियातील मूळ कंपनीविरोधात गेल्या काही काळापासून निदर्शने सुरू होती. सप्टेंबर महिन्यात विमानतळ कर्मचाऱ्यांनीही बंद पुकारला होता. या करारामुळे त्यांच्या नोकऱ्यांवर गदा येईल आणि कामाच्या ठिकाणी अडचणी निर्माण होतील, असे राष्ट्राध्यक्ष रुटो (William Ruto) यांनी म्हटले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -