मुंबई : विधानसभा निवडणुकीनंतर आणि निकालाआधी महाराष्ट्रात सीएनजी गॅसच्या दरात दोन रुपयांनी वाढ (CNG Price Hike) करण्यात आली आहे. महानगर गॅस कंपनीने याबाबतचा निर्णय घेतला आहे. आजपासून नवे दर लागू होणार आहेत.
मुंबईसह महानगरचे गॅस ज्या ज्या भागांमध्ये वापरले जातात तिथे हा निर्णय घेण्यात आला आहे. दरवाढीनंतर गॅस आता ७७ रुपये प्रति किलोग्रॅम मिळणार आहे. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला चांगलीच कात्री लागली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इनपुट कॉस्ट वाढवल्याने एमजीएलने दरात वाढ केली आहे. नैसर्गिक वायूच्या खरेदीत वाढ आणि इतर ऑपरेटिंग खर्चात वाढ झाल्याने कंपनीने गॅसचे दर वाढवले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील बाजार स्थिर नाही. शिवाय तेलाच्या किंमतीतही सतत बदल होत आहेत. त्याचे परिणाम देखील जगभरात दिसून येत आहेत.
कंपनीने याआधी जुलै महिन्यात सीएनजीची किंमत वाढवली ((CNG Price Hike)) होती. सीएनजीच्या दरात किलोमागे १.५० रुपयांची वाढ करण्यात आली होती. त्यानंतर सीएनजीची किंमत ७५ रुपये किलो होती. आता २ रुपयांनी दरवाढ करण्यात आली आहे. त्यामुळे गृहिणींचं बजेट कोलमडणार आहे.