Kudal : कुडाळ मतदारसंघाचा निकाल दुपारी १२ पर्यंत होणार स्पष्ट

  159

मतमोजणीसाठी १४ टेबल आणि २० फेऱ्या


पक्ष कार्यकर्त्यांना थांबण्यासाठी जागा निश्चित


सिंधुदुर्ग : कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाची (Kudal-Malvan Assembly Constituency) मतमोजणी शनिवार दिनांक २३ नोव्हेंबर रोजी कुडाळ तहसील कार्यालय येथे होणार आहे. सकाळी आठ वाजता ही मतमोजणी सुरू होणार आहे. त्यासाठी १४ टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे.


१४ टेबलवर ही मतमोजणी होणार असून एकूण २० फेऱ्या होणार आहेत. त्यासाठी २५८ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. २३ रोजी सकाळी आठ पासून मतमोजणी सुरू होऊन दुपारी १२ पर्यंत कुडाळ-मालवण मतदारसंघाचा निकाल स्पष्ट होणार आहे. सुरक्षेच्या दृष्टीने तीन टप्प्यांमध्ये सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे, अशी माहिती कुडाळ निवडणूक निर्णय अधिकारी ऐश्वर्या काळुशे यांनी दिली.


प्रशासन स्तरावर नियोजन करण्यात येत आहे. विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी मतदान प्रक्रिया झाली. त्यानंतर आता सर्वांनाच निवडणुकीच्या निकालाचे वेध लागले आहेत. राजकीय स्तरावर विविध लोकप्रतिनिधी मतांची आकडेवारी करण्यात व्यस्त आहेत तर प्रशासन मात्र निवडणुकीची मतमोजणी आणि निकालाची जय्यत तयारी करण्यात व्यस्त आहे. या अनुषंगाने कुडाळ तहसील कार्यालय येथे मतमोजणीची जय्यत तयारी सुरू आहे.


कुडाळ - मालवण विधानसभा मतदारसंघात एकूण २७९ मतदान केंद्रे असून त्यासाठी एकूण १४ टेबलवर मतमोजणी होणार आहे. एका फेरीत १४ केंद्राची मतमोजणी होणार आहे. एकूण २० फेऱ्यांमध्ये मतमोजणी पूर्ण करण्यात येणार आहे.


निवडणूक मतमोजणी कालावधीत सुरक्षा यंत्रणा कडेकोट ठेवण्यात येणार आहे. या मतमोजणी दरम्यान दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना थांबण्यासाठी हॉटेल अभिमन्यू जवळचा परिसर व एस. एन. देसाई चौक या ठिकाणचा परिसर अशा दोन ठिकाणांची निवड करण्यात आली आहे. जागा लवकरच त्या त्या पक्षाच्या नेत्यांना सांगण्यात येतील, अशी माहिती कुडाळ पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी दिली.

Comments
Add Comment

सॅमसंगकडून Galaxy Book5 लाँच

सुलभ एआय-पॉवर्ड कॉम्प्युटिंग गॅलेक्सी बुक५ हा एआय-पॉवर्ड लॅपटॉप आहे एआय फोटो रीमास्टर, एआय सिलेक्ट, हॉटसह

जम्मू-काश्मीर: रामबनमध्ये ढगफुटीमुळे हाहाकार; तीन ठार, पाच बेपत्ता

जम्मू-काश्मीर: जम्मू आणि काश्मीरमधील रामबन जिल्ह्यात ढगफुटीसदृश पाऊस आणि भूस्खलनामुळे मोठे नुकसान झाले आहे.

Samsung Galaxy A17 5G भारतात लाँच, किंमत आणि फीचर्स जाणून घ्या

मुंबई: सॅमसंगने आपला नवीन बजेट स्मार्टफोन, Samsung Galaxy A17 5G, भारतात लाँच केला आहे. हा फोन दमदार फीचर्स आणि आकर्षक डिझाइनसह

Health: या ५ पदार्थांमध्ये अंड्यापेक्षाही जास्त असतात प्रोटीन्स

मुंबई : प्रोटीन्स हे शरीराच्या वाढीसाठी आणि स्नायूंच्या विकासासाठी अत्यंत आवश्यक पोषक घटक आहेत. अनेक लोक

व्लादिमीर पुतिन डिसेंबरमध्ये भारतात दौऱ्यावर येणार

पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत करणार द्विपक्षीय चर्चा नवी दिल्ली : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आगामी

रिपेअरला दिलेल्या फोनमधून महिलेचे प्रायव्हेट व्हिडीओ लीक, पुढे जे घडलं..

कोलकाता: आज असा कोणताच व्यक्ति दिसणार नाही, ज्याच्याकडे मोबाईल नाही. मोबाईल आज मूलभूत गरजेची वस्तु बनत चालला