भक्ताला नाही काही कमी ।।१।।
भक्त पुसे कशी करावी प्रगती
साऱ्याची व्हावी चांगली प्रगती ।।२।।
स्वामी वदे उठावे पहाटे पहाटे
लांब लांब तुडवावी वाट पहाटे ।।३।।
योगासने करूनी प्रसन्न व्हावे पहाटे
१२ सूर्यनमस्कार घालावे पहाटे ।।४।।
करावे रोज थोडे भुजंगासन
मकरासन, हलासन, पद्मासन ।।५।।
तर कधी पवन मुक्तासन व नौकासन
हनुमंताचे वज्रासन, अर्जुनाचे धनुरासन ।।६।।
प्रसन्न ठेवील, ताडासन, त्रिकोणासन
चक्रासन, वक्रासन व बद्धपद्मासन।।७।।
पोटाचे विकार जातील करता सुप्तवज्रासन
सर्वांगासन, शलभासन, कटी वक्रासन।।८।।
मेंदू तल्लख होईल करता शीर्षासन
पूर्ण आराम वाटेल करता शवासन।।९।।
आयुष्याची पार होईल नौका करता नौकासन
वीरपुत्र बनतील सारे करता वीरभ्रदासन।।१०।।
पहाटेची बघता लाली
गाली येईल सुंदर लाली।। ११।।
नको तुम्हाला पावरड, स्नो-फणी
योगासनाने प्रसन्न होतील सर्वजणी।।१२।।
पहाटे उगवतो तेजस्वी सूर्यमणी
प्रसन्न होईल मंगळसूत्रमणी।।१३।।
प्रसन्न हसते पाठी ती दत्तमुर्ती
कायावाचे तुम्हीच विष्णुलक्ष्मी मूर्ती।।१४।।
योगासने अंगात येते स्फूर्ती
लक्ष्मी प्रेमाने आशीर्वाद देती।।१५।।
कामे करा जलदगती
कामाला देती गती ।।१६।।
आनंदी तब्येतीची ऐकता कथा
यंदा भक्त पुसे वाढवू कसा व्यापार धंदा।।१७।।
स्वामी वदे तोंडात ठेवा साखर यंदा
गोड बोलून करावा धंदा ।।१८।।
गरम डोक्यावरती ठेवा बर्फ
ठेचून काढा वाईट सवयी सर्प ।।१९।।
पायाला लावा भुईचक्र
हाती धरूनी सुदर्शनचक्र ।।२०।।
राहा सदा उत्साही
नेहमी राहा साहसी।।२१।।
धैर्यवान अदम्य साहसी
वाढवा बुद्धी परग्रहवासी ।। २२।।
राहा शक्तीमान प्रवासी
पराक्रम करा परआवासी ।।२३।।
सहा गोष्टी असता तेथे साक्षत स्वामी धावतील तेथे।।२४।।
क्षणाक्षणाने वाचवा वेळ
कणाकणाने ठेवा पैशाचा मेळ।।२५।।
सिंहाच्या मुखात प्रवेश न करिती हरीण
न शिकार करता सिंहस्थिती करुण।।२६।।
म्हणा शंभर वर्षे जगणार
भरपूर मी काम करणार ।।२७।।
समाजाची नि:स्वार्थ सेवा करणार
गुरू, मातापिता सेवा मी करणार ।।२८।।
लक्षात ठेवा उद्या मरणार
आजच साऱ्या कामाचा तारणहार।।२९।।
ठेवा मोठे मोठे ध्येय
काम करूनी घ्या श्रेय ।।३०।।
बांधा मोठी उद्योग, मंदिरे
तदनंतर ती देव मंदिरा ।।३१।।
आधी शेकडोंना नोकरी चारा
नंतर गाई-वासरू चारा ।। ३२।।
आधी बांधा विद्यार्थीशाळा
नंतर त्या अपंग शाळा।। ३३।।
आधी बांधा पंचतारांकित हॉटेल
नंतर बांधा कॅन्सरची इस्पितळे ।।३४।।
बांधा रस्ते, धरण, कालवे
शेतकरी पंपमोट चालवे।।३५।।
नका राहू नाजूक व्हा, बळकट
खा नेहमी ताजे नको तेलकट ।।३६।।
खा भरपूर फळे, भाज्या
नेहमी असाव्या त्या ताज्या ताज्या ।।३७।।
मुलींना स्वरक्षणाचे धडे
गरिबांना वह्या-पुस्तके धडे ।।३८।।
रडत कार्य नको कोणते
हसत आनंदाने कार्य ते शोभते ।।३९।।
बांधा भक्तांसाठी मजबूत घरे
मजबूत करा भगिनीची दारे।।४०।।
बांधा वाटसरूसाठी धर्मशाळा
स्वच्छ, सुंदर दणकट कर्मशाळा।।४१।।
द्या शेजारी मुलांबाळा प्रेम
दसपट येईल तम्हाकडेच प्रेम ।। ४२।।
आठवा ती श्यामची आई
अन्ं गाडगे बाबा, साई ।।४३।।
कर्म काशी वाई
चांगले कर्म आपली दाई ।।४४।।
नको वाट पाहू नकोरे
केव्हा मरतात सासू-सासरे ।। ४५।।
तुमचेही माता पिता उभेदारे
तरी आहेत कोणाचे सासू-सासरे ।। ४६।।
नका ढकलू मातापिता वृद्धाश्रमी
घरी येईल कृष्ण आनंदाश्रमी।।४७।।
मुला-मुली शिकवा संस्कार
शोधा आनंदाचे प्रकार ।।४८।।
हसत खेळत करा संसार
द्या एकमेकां खरा आधार ।।४९।।
भक्तांचे आनंदाचे प्रावदान
हेच स्वामींचे भक्ताला दान ।।५०।।
भक्त सुखी आनंदी सधन
स्वामींचे हेच आहे खरे धन ।। ५१।।
काम कर दणादण
स्वामी नाम हेच खरे धन ।। ५२।।
स्वामी बाव्वनी संपूर्णम।।
vilaskhanolkardo@gmail.com
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…