Friday, May 9, 2025

मनोरंजनताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

Reshma Shide : रेश्मा शिंदे पुन्हा अडकणार लग्नबंधनात!

Reshma Shide : रेश्मा शिंदे पुन्हा अडकणार लग्नबंधनात!

केळवणाचे फोटो व्हायरल


मुंबई : सध्या कलाविश्वातील (Entertainment News) अनेक सेलिब्रिटी लग्न करत आहेत. अशातच लगोरी, रंग माझा वेगळा, घरोघरी मातीच्या चुली अशा मालिकेत मुख्य भुमिका साकारलेली रेश्मा शिंदे (Reshma Shinde) पुन्हा लग्नबंधनात (Marriage) अडकणार असल्याचे समोर आले आहे. रेश्माचे केळवण (Kelvan) पार पडले असून याबाबतचे तिचे सोशल मीडियावर फोटो व्हायरल झाले आहेत.



नुकतेच ‘रंग माझा वेगळा’ (Rang Maza Vegla) मालिकेतील कलाकारांनी रेश्माचे केळवण केले आहे. यामध्ये रेश्माचे जवळचे कलाकार मित्रही उपस्थित होते. 'जीवनात ही घडी अशीच राहू दे' हॅशटॅग डियर समवन असे कॅप्शन देत अभिनेत्री रेश्माने पोस्ट शेअर केली आहे. दरम्यान, नात्याबद्दल कोणतीही हिंट न देता तिच्या केळवणाचे फोटो समोर आल्यानं चाहत्यांना सुखद धक्का बसला आहे.






 










View this post on Instagram























 

A post shared by Reshma Shinde (@reshmashinde02)





रेश्माच्या (Reshma Shide) केळवणाचे फोटो समोर आल्यानंतर आता रेश्माच्या आयुष्यातला तो कोण? असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे. त्यामुळे सध्या चाहत्यांमध्ये रेश्माच्या जोडीदाराबद्दल मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु झाल्या आहेत.

Comments
Add Comment