Tuesday, February 11, 2025
Homeताज्या घडामोडीNIA Action : जम्मू-काश्मिरात एनआयएची छापेमारी!

NIA Action : जम्मू-काश्मिरात एनआयएची छापेमारी!

जम्मू : राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) आज दहशतवादी घुसखोरी प्रकरणी जम्मू-काश्मीरमध्ये धाडी टाकल्यात. यावेळी एनआयएने निमलष्करी दल (Paramilitary Force) आणि पोलिसांच्या मदतीने राज्यात एकाच वेळी ८ ठिकाणी छापे टाकले. यामध्ये रियासी, उधमपूर, रामबन, किश्तवाड आणि डोडाचा समावेश आहे.

Bitcoin : बिटकॉईन प्रकरण, ईडीने छत्तीसगडमध्ये टाकले छापे

मागील काही दिवसांमध्‍ये राज्‍यात घुसखोरीच्‍या प्रकारात वाढ झाली आहे. त्‍याची गंभीर दखल घेत राष्‍ट्रीय तपास संस्‍थेने ही कारवाई केली आहे. सुमारे आठवडाभरापूर्वी ‘एनआयए’ने दहशतवाद्‍यांना आर्थिक रसद पुरवल्‍याप्रकरणी जम्मूच्या बजलहटा येथे साहिल अहमद याच्‍या घरावर छापा टाकला होता. तपासादरम्यान एनआयएला साहिल अहमदच्‍या खात्यात १५ लाख रुपये संशयास्पदरित्या जमा झाल्याचे आढळले होते. अहमदाबादच्या मोस्ट वॉण्टेड यादीत समाविष्ट असलेल्या हुमायून खान नावाच्या फरारी गुन्हेगाराने १५ लाख रुपयांची ही रक्कम जमा केल्‍याचेही स्‍पष्‍ट झाले होते.

साहिल अहमद याचा काका गुलजार अहमद मलिक १९९२ मध्ये हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी बनला होता, असे एनआयएच्या तपासात समोर आले होते.. गेल्या काही वर्षांपासून तो पाकिस्तानातील सियालकोट येथे राहत होता. एनआयआयएच्या टीमने साहिल आणि त्याच्या काही नातेवाईकांचीही चौकशी केली होती. (NIA Action)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -