vv राज्यातील विधानसभा निवडणुकीत बिटकॉईनचे प्रकरण चांगलेच गाजत आहे. या निवडणुकीदरम्यान बिटकॉईनचा वापर झाल्याचा आरोप केला जात आहे. या आरोपावरून अंमलबजावणी संचालनालयाने बुधवारी छत्तीसगडमध्ये छापा टाकला.
आदल्याच दिवशी भाजपाकडून सुप्रिया सुळे आणि नाना पटोले यांच्यावर आरोप करण्यात आले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी ही कारवाई करण्यात आली. केंद्रीय अन्वेषण विभागाकडूनही बिटकॉईन घोटाळाप्रकरणी गौरव मेहताला समन्स बजावण्यात आले आहेत. मेहताला लवकरात लवकर चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश सीबीआयकडून देण्यात आलेत.
मंगळवारी भाजपने खासदार सुप्रिया सुळे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधात बिटकॉईन वापराचे आरोप केले. यावेळी त्यांनी ध्वनीफितही जारी केली. भाजपचे खासदार तसेच प्रवक्ते सुंधाशू त्रिवेदी यांनी मंगळवारी रात्री ही पत्रकार परिषद घेतली होती. यादरम्यान हे आरोप करण्यात आले.
तसेच त्यांनी पुरावे म्हणून कॉल रेकॉर्ड्स आणि व्हॉट्सअॅप चॅटचे स्क्रीनशॉटही सादर केले. भाजपने मंगळवारी पत्रकार परिषद घेत पटोले आणि सुळे यांच्यावर आरोपबाजी केली. सुप्रिया सुळे आणि पटोले यांनी परकीय चलनाचा वापर करत मतदानावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचेही म्हणाले.