
मुंबई : मुंबईकरांचा प्रवास सुकर होण्यासाठी रेल्वे प्रशासन (Railway Administation) नेहमीच कार्यरत असते. अशातच रेल्वे प्रवाशांना दिलासा देणारी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. लवकरच मध्य रेल्वे (Central Railway) आणि पश्चिम रेल्वेकडून (Western Railway) नागरिकांच्या सेवेसाठी आणखी लोकल (Extra Local) दाखल होणार आहेत. त्यामुळे नागरिकांचा प्रवास सुकर होणार आहे.

मुंबई : राज्यभरात विधानसभा निवडणुकीचे (Assembly Election 2024) मतदान (Voting) प्रक्रिया पार पडत असून येत्या २३ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. दरम्यान, आज सकाळी सात ...
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, चार वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर पश्चिम आणि मध्य या दोन्ही मार्गांसाठी नवीन उपनगरीय ट्रेन मिळाल्या आहेत. पश्चिम रेल्वेच्या (Western Railway) १० ते १२ एसी सेवांमध्ये आणखी एक लोकल दाखल होणार आहे. ही ट्रेन विरार यार्डात दाखल झाली असून आठवडाभर या लोकलची टेस्टिंग होणार आहे. त्यानंतर प्रवाशांच्या सेवेसाठी उतरणार आहे.
त्याचबरोबर, मध्य रेल्वेला (Central Railway) १२ डब्यांची सामान्य लोकल मिळाली आहे. चौथा कॉरिडॉर असलेल्या बेलापूर-उरण मार्गिकेवर सुरू असलेल्या जुन्या लोकलच्या जागेवर धावणार आहे. (Mumbai Local)