Monday, February 17, 2025
Homeताज्या घडामोडीMumbai Goa Highway : गावाकडे निघालेल्या मतदारांना वाहतूक कोंडीचा फटका!

Mumbai Goa Highway : गावाकडे निघालेल्या मतदारांना वाहतूक कोंडीचा फटका!

मुंबई : राज्यभरात विधानसभा निवडणुकीचे (Assembly Election 2024) मतदान (Voting) प्रक्रिया पार पडत असून येत्या २३ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. दरम्यान, आज सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. सर्व राजकीय नेते मंडळी, अभिनेते, सर्व सामान्य नागरिक मतदानाचा हक्क बजावत आहेत. मात्र अशावेळीच मतदान करण्यासाठी गावाकडे निघालेल्या चाकरमान्यांचे मोठे हाल होत असल्याचे दिसून येत आहे.

Assembly Election: मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पुण्याहून येणारी मुले अमरावतीत अडकली

मिळालेल्या माहितीनुसार, विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी मतदार गावी निघाले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक एसटी बसेस उपलब्ध केल्या आहेत. मात्र गावाकडे जाणाऱ्यांची संख्या मोठी असल्यामुळे प्रवाशांना बसमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

दरम्यान, एसटीचा फटका बसत असल्यामुळे मतदान करण्यासाठी गावी जाणाऱ्या मतदार खाजगी वाहनांचा वापर करत आहेत. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर (Mumbai Goa Highway) मोठी वाहतूक कोंडी (Traffic Jam) निर्माण झाली असून मतदारांनाही मतदान केंद्रावर (polling station) पोहोचण्यासाठी विलंब होत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -