Israel: इस्त्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांच्याविरोधात न्यायालयाने जारी केला अटक वॉरंट

जेरुसलेम: इस्रायलचे(israel) पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू आणि माजी संरक्षण मंत्री योव्ह गॅलंट यांच्यावर इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टाने (आयसीसी) युद्ध गुन्हे आणि मानवतेविरुद्धच्या गंभीर आरोपांसाठी अटक वॉरंट जारी केले आहे.


गाझा पट्टीत युद्धकाळात सामान्य नागरिकांना लक्ष्य करणाऱ्या हल्ल्यांसाठी आयसीसीने नेतान्याहू आणि गॅलंट यांच्यावर हत्या, शोषण आणि अमानवीय कृत्यांबद्दल गुन्हे दाखल केले आहेत. इस्रायलने गाझातील नागरिकांना अन्न, पाणी आणि वैद्यकीय सुविधा रोखल्यामुळे मोठ्या प्रमाणावर मृत्यू आणि संकटांना सामोरे जावे लागल्याचे आरोप केले आहेत. यात लहान मुलांचा मृत्यू आणि मानवीय त्रासाचे पुरावे आढळल्याचे कोर्टाने नमूद केले आहे.


आयसीसीच्या अहवालानुसार, नेतान्याहू यांनी जाणूनबुजून सामान्य नागरिकांना लक्ष्य बनविले, याबाबतचे पुरेसे पुरावे उपलब्ध आहेत. दरम्यान, गाझातील युद्धबंदीबाबत कोणताही ठोस तोडगा निघालेला नाही. हमासचे गाझा प्रमुख खलील अल-हय्या यांनी स्पष्ट केले की, जोपर्यंत युद्धबंदी होत नाही, तोपर्यंत कैद्यांची अदलाबदल होणार नाही. अमेरिकेने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या विनाअट युद्धबंदी प्रस्तावावर व्हेटो लावला आहे. मात्र, ओलीसांची सुटका करणाऱ्या प्रस्तावाला अमेरिकेने समर्थन दिले आहे.


गाझा संघर्ष आणि आयसीसीच्या या कारवाईमुळे इस्रायल आणि पॅलेस्टाइनमधील तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. नेतान्याहू आणि गॅलंट यांच्यावर पुढील कारवाईसाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर दबाव वाढत आहे.

Comments
Add Comment

पाकिस्तानात ‘सुप्रीम’चे न्यायाधीश लष्करप्रमुखांच्या विरोधात

इस्लामाबाद : पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयाने बंड केले आहे. मन्सूर अली

शटडाऊन संपल्याने १४ लाख अमेरिकन लोकांना पगार मिळणार

वॉशिंग्टन  : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सरकारी निधी विधेयकावर स्वाक्षरी केल्यामुळे ४३

चीनची मोठी झेप! ऑनर आणणार जगातील पहिला AI Robot Phone, जाणून घ्या खास फीचर्स

बीजिंग – तंत्रज्ञानाच्या विश्वात मोठा बदल घडवणारी बातमी चीनमधून समोर आली आहे. चीनची प्रसिद्ध इलेक्ट्रॉनिक्स

जागतिक नेमबाजी स्पर्धेत सम्राट राणाला सुवर्णपदक

कैरो : कर्नालचा युवा नेमबाज सम्राट राणा याने जागतिक नेमबाजी स्पर्धेत भारतासाठी सुवर्णपदक जिंकले. सोमवारी,

Blast in Pakistan : इस्लामाबादमध्ये भीषण स्फोट! हायकोर्टाजवळ कार ब्लास्ट, आत्मघातकी कार स्फोटात अनेकांचे बळी

इस्लामाबाद : भारताची राजधानी दिल्लीत झालेल्या भीषण स्फोटानंतर आता पाकिस्तानच्या राजधानीतही (Islamabad) आत्मघातकी

मोदींचा भूतान दौरा, द्विपक्षीय संबंधांना मिळणार नवी चालना

भूतान : पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या भूतान दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध